मुंबई - प्रतिनिधी, गुरुनाथ तिरपणकर : आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत पहिल्या आणि दुसऱ्या राष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या अभूतपूर्व यशानंतर आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे आता तिसऱ्या "राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लघुपट सोहळ्यामध्ये भारतातील आणि भारताबाहेरील कुठल्याही भाषेचे लघुपट पाठवू शकतात. फक्त मराठी व हिन्दी लघुपट वगळता इतर भाषिक लघुपटांना "इंग्रजी सबटायटल्स" असणे बंधनकारक असणार आहे.
लघुपटासाठीचा कालावधी जास्तीत जास्त 1 ते 30 मिनिटांचा असावा. या लघुपट सोहळ्यामध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी, 2025 असून यांत सर्वोत्कृष्ट तीन लघुपटांना रोख पारितोषिके व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. शिवाय इतरही वैयक्तिक रोख पारितोषिके आणि सन्मान प्रदान केले जाणार असून सहभागी सर्वच लघुपटांना प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. लघुपट निर्मात्यांनी 2018 ते 2024 ह्या कालावधी अंतर्गत चित्रित झालेले लघुपट पाठवावेत.
लघुपट सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
अधिक माहितीकरता आर्यारवी एंटरटेनमेंटचे आयोजक -
महेश्वर तेटांबे (संपर्क - 9082293867), मनिष व्हटकर (संपर्क - 9969920828), लक्ष्मी गुप्ता (संपर्क - 8082096363) आणि आनंद खाडे (संपर्क - 8879587503) यांच्याकडे संपर्क साधावा.