धारदार तलवारसह आरोपी अटकेत

 




  



मूर्तिजापूर - शहरातील गजबजलेल्या डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ते जुना दर्यापूर मार्गावरील दिपक टी सेंटर समोर २४ वर्षीय युवक हा धारदार तलवार घेवून दहशत निर्माण करीत असताना मूर्तिजापूर शहर पोलिसांनी २१जानेवारी रोजी साडे नऊ वाजताच्या दरम्यान त्याला जेरबंद केल्याची घटना समोर आली आहे .

           मूर्तिजापूरातील दिपक टी सेंटर समोर आरोपी शेख शहबाज शेख अशापाक वय २४ वर्ष रा जुनीवस्ती खडकपुरा हा धारदार तलवार हातात धारदार तलवार घेवून नागरिकांत दहशत पसरवीत असल्याची माहिती ठाणेदार अजीत जाधव यांना मिळताच त्यांनी उपनिरीक्षक आशीष शिंदे व सहकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले . यावेळी आरोपी शेख शहबाज हा हातात धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करीत असल्याचे दिसून आल्यावरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद केले .

याप्रकरणी आरोपी शेख शहबाज शेख अशपाक याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे तसेच ४,२५ शस्त्र अधिनियम १९५९ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post