नववर्षाच्या निमित्ताने शिराळा येथे पूर्णामाय दूध डेअरी च्या दुसऱ्या शाखेचे थाटात उद्घाटन

 


 जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर

 स्थानिक शिराळा येथे दिनांक 1 जानेवारी रोजी नववर्षाचे औचित्य साधून पूर्णा माय दुध डेअरी चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

 शिराळा गावाच्या चौकटीत असलेल्या अमरावती चांदूरबाजार मार्गावर असलेले बोराळा गावातील रहिवाशी असलेले नवयुवक सुशील इंगोले यांनी 15 जुलै 2020 मध्ये शिराळा येथे पूर्ण माय दूध डेअरी ची स्थापना करून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती.

 शिराळा हे गाव परिसरातील मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्यामुळे त्यांनी शिराळा येथील गांधी चौक येथे आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. कुठलाही पारंपारिक व्यवसायाचा अनुभव नसताना. मनामध्ये जिद्द आणि चिकाटी ठेवून बेरोजगारीवर मात करून त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. स्मितभाषी व मनमिळावू स्वभावामुळे व मोठ्या प्रमाणात मित्रपरिवारामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. शिराळा गावातील लोकसंख्या व गावाचा विस्तार लक्षात घेत आज एक जानेवारी 2025 रोजी त्यांनी पुन्हा भिले कॉम्प्लेक्स शॉप नं.1 मुख्य बस स्टॉप रोड येथे पुन्हा दुकान भाड्याने घेऊन त्यांचे मित्र व सहकारी प्रतीक कोल्हे यांच्यासोबत नववर्षाचे औचित्य साधून पूर्णा माय दुध डेअरीच्या दुसऱ्या शाखेची सुरुवात केली. यावेळी उपस्थितांमध्ये उद्घाटन प्रसंगी प्रतीक कोल्हे,पूर्णा माय दुध डेअरीचे संस्थापक सुशील इंगोले, बाबू भाऊ लव्हाळे, श्रीतेश रघुते, मयूर पंडे, हरीश देशमुख, खगेंद्र पावडे, आशिष इंगोले, पत्रकार तथा युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे उपजिल्हाप्रमुख पवन पाटणकर तथा इतर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी सुशील इंगोले यांच्याशी चर्चा केली असता. त्यांच्या मते युवकांनी मोठ्या प्रमाणात व्यवसायाकडे वाटचाल करावी जेणेकरून बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागेल. व युवकांना रोजगार प्राप्त होईल असे त्यांचे यावेळी मत होते. गावातील युवकांनी त्यांच्यापासून व्यवसायाची प्रेरणा घेऊन मोठ्या प्रमाणात व्यवसायाकडे वाटचाल करावी असे आवाहन यावेळी स्थानिक नागरिकांनी युवकांना केले.

Post a Comment

Previous Post Next Post