Amaravatinews,अचलपूर : तालुक्यातील शिंदी बु येथील एका खाजगी संस्थेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनीचा इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाने विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. यानंतर संतप्त पालकांनी शाळेवर धडक देत शिक्षकाच्या कृत्याचा निषेध करत त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत शाळेच्या परिसरात ठेवलेल्या शिक्षकाच्या कारची तोडफोड केली.
घटनेची माहिती होताच पथ्रोट पोलिस स्टेशनचे अधिकारी तत्काळ घटनास्थळावर दाखल होत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी एसआरपीएफ पथक व अतिरिक्त पोलिसांची कुमक घटनास्थळी बोलावली. या दरम्यान पालकांनी शाळेच्या आवारात घुसून शिक्षकाला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या शिक्षकाने आपल्या बचावाकरिता स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. पोलिस अधिकाऱ्यांनी व नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त नागरीक शिक्षकांप्रती रोष व्यक्त करत असतांना या शिक्षकास पोलिसांच्या सुरक्षतेत वाहनात बसून पथ्रोट येथे नेण्यात आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.