बंद पाणीपुरवठा पुर्ववत करण्याची वडगाव ग्रामस्थांची बीडीओंकडे मागणी...!

 






मूर्तिजापूर - तालुक्यातील वडगाव (कुरुम) येथील पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी तेथील उपसरपंच ईश्वर गुलाबराव मांडोकार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थांनी बीडीओंना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 




     तेथील पाणी पुरवठा योजनेचे पाणी हेतुपुरस्सररित्या बंद करण्यात आला आहे, तो पूर्ववत सुरु कण्याबाबत आपण वडगाव ग्राम पंचायत प्रशासनाला आदेश देऊन पाणीपुरवठा सुरु करावा, अशी विनंती महिलांसह पंचायत समितीवर धडकलेल्या महिलांचा लक्षणीय सहभाग असणाऱ्या उपसरपंच, सदस्य,ग्रमस्थांनी बीडीओंना केली. या निवेदनाच्या प्रती आमदार हरीष पिंपळे व उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनाही ग्रामस्थांनी दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post