प्रेरणा फाउंडेशन महाराष्ट्र सामाजिक संस्थेचा भव्य पुरस्कार सोहळा प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धुमधडाक्यात साजरा.





बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
प्रेरणा फाउंडेशन रजि. 564/एफ38784/बदलापूर/ठाणे/महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने 15 डिसेंबर 2024 रविवार रोजी प्रेरणा फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा सकाळी 10 ते दुपारी 3 वाजता श्री.बळालेश्वर मंगल कार्यालय, हेंद्रेपाडा बदलापूर (प). महाराष्ट्र 421503 येथे धुमधडाक्यात साजरा झाला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी यांनी केले, या कार्यक्रमाला रामजीत (जीतू) गुप्ता व मा.ऍड.मोहन शुक्ला, अविनाश म्हात्रे, सचिव वैभव कुलकर्णी, खजिनदार कुमार रोहन गावकर याचे विशेष सहकार्य लाभले. 
प्रेरणा फाउंडेशन हे एक सामाजिक संस्था असून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. प्रेरणा फाऊंडेशन गेले सहा वर्ष सतत गोर गरीब लोकांना, रस्त्यावरील भटकी लोकांना, अनाथांना आधार देण्याचे काम करते. अनेक आदिवासी पाडे सुधारणे,  आदिवासी गावाला रस्ता, वीज, पाणी व लाईट याची सोय, नदया, चौपाटी, एस टी डेपो, रेल्वे  स्टेशन, रस्ते, ठिकठिकाणी स्वछता अभियान राबविणे, अनेक अनाथालय, वृद्धाश्रम, अनाथ रस्त्यावरील भटकी  मुले यांना सहारा व सहकार्य देण्याचे काम करते. व तसेच प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ  व प्रेरणा इन्स्टिटयूट अंतर्गत येणारे उपन्न सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी ह्या प्कॅन्सरग्रस्त, किडनीग्रस्त ई.  मतिमंद निराधार लोकां आधार  देण्यासाठी वापरतात काम करतात. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे (मुख्य तपासी अधिकारी.रामजीत (जीतू) गुप्ता, (अध्यक्ष औदुंबर साहित्य मंच ) , मा.ऍड.मोहन शुक्ला,(पुणे माळीण, गाव उद्धार) मच्छिन्द्रनाथ रामचंद्र झंजारे,  (समाजसेविका) दिपाली शिरापूरे, (शिक्षक, शैक्षणिक क्रांती), प्रशांत पेंधे, (राष्ट्रीय सरपंच दक्षिण झोन अध्यक्ष)  सेवक नागवंशी, (सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रसिद्ध पत्रकार) ,मोहन कदम ,(बृहमुंबई होमगार्ड विभाग),दिलीप नारकर, (अध्यक्ष दीनदयाल कुष्ठरोग संस्था, अध्यक्ष), अविनाश म्हात्रे, (आर.एस.पी.ऑफिसर  नवी मुंबई). प्रियंवंदा तांबोटकर, (ठाणे ग्रामीण पोलीस दल 1998), संजय हिरु घुडे, राजेश भांगे (उद्योजक), राजेश भांगे), (जाणता राजा अभिनेत्री) लेखा तोरसकर, (सामाजिक कार्यकर्ता) मा.श्री लोकेश पाटील या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी, सन्मानित निमंत्रित अतिथी व कमिटीच्या हस्ते करण्यात आला.
 या सोहळयाला सामाजिक, शैक्षणिक, कला क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या काना- कोपऱ्यातून आलेल्या सन्मानित पुरस्कार्थीना सन्मानित   प्रेरणा वैभव कुलकर्णी व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैभव कुलकर्णी यांनी सूत्र संचालन निभावले. सौ प्रेरणा वैभव कुलकर्णी यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.कु. समयरा हर्षल शिंदे सुंदर डान्स करून तर .कु. शुभ्रा तिळगुळकर ने एक छोटासा ऍक्ट करून सर्वांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाला  कु रोहन मंगेश सावंत, श्रुती आठल्ये , सदस्य गंधाली तिरपणकर, कु.शैलेश सणस, दीपाली चव्हाण, सुनील इंगळे, हर्षल शिंदे,यशवंत खोपकर, कु.परेश परब, आश्लेषा, आदिती यांचे  सहकार्य लाभले. व अनिता कळसकर  माधुरी भोईरकर सुंनंदा पाटील  सुरज भोईर गरुनाथ तिरपणकर यासारख्या कर्तृत्वान लोक किमान 100 महिला व जवळ जवळ 300 हुन अधिक लोक उपस्थित होते कार्यक्रमात होत्या सौ प्रेरणा कुलकर्णी यांनी सर्वांचे  आभार मानले व सुंदर स्वादिस्ट भोजनाने जवळजवळ 250 हुन अधिक लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला व तसेच 50/60 व्यक्तीचे जेवण बदलापूर येथील  येथील संयोपिता अनाथाश्रम   ईस्ट मध्ये अनाथा लोकांसाठी पाठविण्यात आले. व कार्यक्रमाची सांगता झाली.


Post a Comment

Previous Post Next Post