सोयाबीन फेकले रस्त्यावर..!
शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष समिती अमरावतीच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एक दिवसीय धरणा आंदोलन
गावाकडची बातमी प्रतिनिधी अनिल पाटणकर
अमरावती : दि.17/12/2024 रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी नेते जगदीशनाना बोंडे,युवानेते प्रकाश साबळे,संजयराव कोल्हे, पौर्णिमा सवई,गजानन अमदाबादकर, छोटू महाराज वसू,ऍड.नंदेश अंबाडकर, काशीनाथजी फुटाणे,संजयराव तायडे,गजाननराव बोंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या 5 प्रमुख मागण्यांसाठी जवळपास 400 शेतकऱ्यांना घेऊन दिला धरणा..
शेतमालाला भावांतर योजना लागू करा,
7/12 कोरा करा
नाफेड मार्फ़त सोयाबीन खरेदीला अडचणीत आणणाऱ्या जाचक अटी रद्द करा
सोयाबीनला 6000 रु.भाव व कापसाला 10000 रु भाव द्या
ह्या मागण्या शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनात व्यक्त केल्या..
ह्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमरावती मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना प्रचंड शेतकऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले..
सदर आंदोलनात महेश देशमुख,उमेश महिंगे, प्रशांत डहाने,समीर जवंजाळ,रुपेश कळसकर,प्रवीण कोल्हे,सतीश दिवाण,अमोल राऊत,योगेश निंभोरकर,अर्जुन सनके,ज्ञानेश्वर काळे,निलेश उभाड,योगेश बोबडे,दीपक कुथे, अक्षय साबळे,प्रशांत राजनकर,अतुल ढोके, सतीश तुळे, नाना डहाने,पुरुषोत्तम धोटे,स्वप्नील कोठे यांच्यासह जवळपास 400 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला..