२८ वर्षीय विवाहित महिलेची गळफास घेवून आत्महत्या

 

 माना पो स्टे हद्दीतील कुरुम येथील घटना




     

मूर्तिजापूर - तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरुम येथे २८ वर्षीय महिलेने पाळण्याचा दोराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना  गुरुवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान  उघडकीस आली .

तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरुम येथील २८ वर्षीय सपना आशिष मालधुरे या विवाहितेला एक मुलगा ,एक मुलगी असून पती हा शेती करतो . १९ डिसेंबर रोजी दुपारी महिलेचा पती आशीष नारायण मालधुरे हा घरुन दुपारी दिड वाजता कँन्व्हेटमध्ये शिकत असलेल्या मुलीला घरी आणण्यासाठी शाळेत गेल्यावर  दुपारी २ वाजता दरम्यान सपना हिने घराच्या खोलीत बाळासाठी असलेल्या पाळण्याच्या दोरीचा गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना पतीच्या लक्षात आल्याने सदरची वार्ता गावभर पसरल्याने घटनास्थळी एकच गर्दी जमा झाली होती . माना पोलिसांना घटनेची माहिती प्राप्त होताच , ठाणेदार सुरज सुरोशे , उपनिरीक्षक गणेश महाजन , अमंलदार अविनाश बोरसे , दिपक सोळंके ,महिला पोलीस जयश्री मेंढे यांनी घटनास्थळी दाखल होवून प्रेताचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले . याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास माना पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post