जिल्ह्यातील सर्व तालुका शहर व गावागावत असलेल्या महामानव व राष्ट्रसंतांच्या पुतळ्याच्या संरक्षणाकरिता सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे...भारतीय दलित पँथर

 



अमरावती प्रतिनिधी :- पवन पाटणकर 

:आज रोजी भारतीय दलित पँथर या सामाजिक संघटनेतर्फे मा. मुख्यमंत्री साहेब. मा. जिल्हाधिकारी साहेब अमरावती( ग्रामीण) यांना निवेदन देण्यात आले.

 आपला देशामध्ये व राज्यामध्ये थोर महामानव,व राष्ट्रसंत जन्माला आले. ज्यांनी आपले आयुष्य पूर्णपणे जनसेवेत घालवले आहे. गुलामीत असलेल्या दलित, शोषित,पीडित शेतकरी,कामगार,कष्टकरी,वंचित समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलून माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार मिळवून दिला. ज्यांनी आयुष्यभर किर्तन व प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तळागाळातील अशिक्षित जनतेला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अशा थोर महापुरुष व राष्ट्रसंतांचे पुतळे जनतेने अमरावती शहरातील नगरा- नगरात व तालुक्यातील गावा गावात बसविले आहे. जेणेकरून त्यांनी केलेल्या अनमोल कार्याचा इतिहास जिवंत राहावा. व त्या इतिहासाची प्रेरणा घेऊन इथला नवयुवक तयार व्हावा. परंतु समाजात वावरत असताना काही समाजकंटक विनाशक बुद्धीचे लोक पण येथे राहतात.

 असे लोकं नेहमी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. असे विनाशकारी बुद्धीचे लोक महामानवाच्या व राष्ट्रसंताच्या मूर्तीची विटंबना करून राज्यामध्ये व देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण करतात. असाच प्रकार लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अमरावती शहरातील वडाळी या परिसरात घडला होता. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला दगडफेक केली होती. तेव्हा पोलिसांनी व जनतेने समजदारीची भूमिका घेऊन वातावरण शांत ठेवले असाच काहीसा प्रकार विधानसभा निकालाच्या वेळेस तिवसा शहरांमध्ये घडला आहे. अशा प्रकारची भरपूर उदाहरणे आहेत. जे शहरातील गावातील बदमाश गुंड काही राजकीय जाणून बुजून दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी तयारीत असतात. अशा कुटील प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालण्यासाठी दोन समाजामध्ये वाद होऊ नये. 

 गावातील व शहरातील वातावरण नेहमी शांत रहावे व जो कोणी चुकीच्या मार्गाने महामानवांची विटंबना करतो अशांना पुराव्यासहित पकडता यावे याकरिता शहरातील नगरा नगरात व गाव गावातील चौका चौकामधील महामानवांच्या व राष्ट्रसंतांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.या मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय दलित पँथर चे नेते लक्ष्मण मेश्राम सुधाकर पाटील प्रकाश डोंगरे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील अमरावती मनोज धुळेकर अजय रामटेके केशव गायकवाड धर्मा बागडे नागेश पाटील प्रशांत रामटेके राजूभाऊ शेंडे पंकज रंगारी शिवदास गायकवाड रवी शेंडे आधी सर्व उपस्थित होते..


Post a Comment

Previous Post Next Post