श्रीकांत राऊत यवतमाळ
महागांव, ता. १८ : तालुक्यातील ज्येष्ठ भजन गायक सखाराम वाघमारे यांचे मंगळवारी (ता.१७) रोजी रात्री १० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९६ वर्षे होते. सखाराम वाघमारे हे ज्येष्ठ भजन गायक आणि शासनमान्य वृद्ध कलावंत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा त्यांनी भजनातून प्रचार व प्रसार केला. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. जेष्ठ पत्रकार गजानन वाघमारे व विठ्ठल वाघमारे यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता.१८) रोजी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत महागांव येथिल स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
Tags
गावाकडची बातमी