मुडाणा येथे निजधाम आश्रमात स्व. श्री संत एकनाथ महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

 




श्रीकांत राऊत यवतमाळ 


महागाव तालुक्यातील मुडाणा येथील

आज १८डिसेम्बर रोजी मुडांना येथील निजधाम आश्रमाचे संस्थापक स्व. श्री संत एकनाथ महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करन्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य तानाजी बापू हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थांनचे अध्यक्ष परसराम भ.वानखेडे साहेब संचालक सदानंद रा. पाटील, संचालक देवानंद अण्णा वानखेडे, गुरूंचे नातू गजानन तरटे बाळू जाधव हे होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर यांनी प्रास्ताविक सादर करताना संत एकनाथ गुरू यांनी विद्यालयाची उभारणी करताना केलेले परिश्रम यांची जाणीव करून दिली, संचालक देवांनंद अण्णा वानखेडे यांनी श्री संत एकनाथ यांच्यामुळे आपली मुडांना नगरीं पवित्र आणि पावन झाली यावर मत मांडले.

अध्यक्षनिय संबोदनात गुरुवर्य तानाजी बापू यांनी श्री संत एकनाथ महाराज यांच्या जन्मापासून च्या सर्व आठवीनींना उजाळा दिला.संत एकनाथ महाराज यांच्या जीवनात अतिशय संघर्ष चालू असताना स्व. विमलबाई रा. पाटील यांनी आपल्या प एकनाथ गुरूचा सांभाळ केला आणि त्यांच्याच पाठबळामुळे गुरूला आश्रम उभा करण्यासाठी बळ मिळाले. गुरूंनी आश्रमात मानवी जीवनाला लागण्याऱ्या मूलभूत गरजापैकी अण्ण, वस्त्र, आणि निवांऱ्याची उत्तम व्यवस्था केली. त्यांच्या पच्छात संस्थांन चे अध्यक्ष वानखेडे साहेब यांनी परिवर्तनाची दूरदृष्टी समोर ठेऊन विद्यालयाचा कायापालट केला.झोपडीत सुरुवात झालेल्या शाळेच आज भव्य आणि दिव्य स्वरूपाच्या वास्तूत रूपांतर होण्यात वानखेडे साहेब यांचा खूप मोलाचा वाटा आहे.यावेळी विद्यालय सुध्दा प्रगती पथावर असून सावंत सरांच्या नियोजनाचे व त्यांच्या सर्व सहकार्याचे कौतुक यावेळी बापूनी केले.

व सर्व उपस्थिती मंडळीचे आभार निजधाम आश्रम विद्यालयाचे सहायक शिक्षक बोरकर सर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post