किनवट : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या आळंदी देवाची येथे पार पडलेल्या आठव्या निसर्ग व पर्यावरण संमेलन प्रसंगी किनवट तालुका अध्यक्षपदी बबनराव वानखेडे यांची निवड करण्यात आली.
किनवट येथील पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवड व संवर्धन या क्षेत्रात काम करणारे बबनराव वानखेडे यांना दिनांक 29 डिसेंबर रोजी आळंदी देवाची येथे पार पडलेल्या निसर्ग व पर्यावरण संमेलन कार्यक्रमांमध्ये मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद दादा मोरे, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कराळे पाटील, जिल्हाध्यक्ष सारनाथ लोने सर, गरजे सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेने आणि स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या या मंडळाचे कार्य राज्यभर अविरतपणे सुरू असून या कार्यात हजारो माणसे जोडली जाऊन तरुणांनी या पर्यावरणीय चळवळीत पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे, पुणे मनपाचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, देविदास आश्रम शाळेचे प्रमुख ह. भ. प. निरंजनशास्त्री कोठेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, इंद्रायणी बचाव समितीचे विठ्ठल शिंदे, ॲड. लक्ष्मण येळे, छायाताई राजपूत, विलास महाडिक, मनिषाताई पाटील, लतिकाताई पवार, प्रभाकर म्हस्के, अलका गव्हाणे, कांचन सावंत, बबन जाधव, ज्ञानेश्वर कराळे, सारनाथ लोणे, गर्जे सर, बबन वानखेडे आदी उपस्थित होते.