मूर्तिजापूर - खरीप हंगामात लागवड झालेल्या मात्र रब्बी हंगामात उत्पन्न मिळणाऱ्या तूरीचे पिक सध्या परिस्थितीत फुलांच्या अवस्थेत जबरदस्त बहरलं असल्याचे दिसून येत आहे परंतू वातावरणातील बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे बोलल्या जात आहे.
सध्या परिस्थीतीत रब्बी हंगाम सुरू झाला असून निसर्गाच्या नियमाप्रमाणे हिवाळा ऋतू चालू आहे मध्यंतरी थंडीने चांगला जोर धरला होता थंडिचे वातावरण हे पिकांसाठी पोषक ठरते असे म्हणतात अशातच तूरीचे पिक हे फुलांच्या अवस्थेत असून जोरदार बहरल्याचे दिसते आहे मात्र दोन- तिन दिवसांपासून अचानक वातावरणात बदल झाला आहे आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे यामुळे चिंतेत वाढ झाल्याचे शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे कारण या वातारणामुळे फुल गळती व मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव आणि पिकांवर रोगराईचे सावट निर्माण होऊन फवारणीचा आगाऊ आर्थिक भुरदंड सोसावा लागतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कारण लागवडीपासून तर उत्पादना घरात येईपर्यंत त्याला मुलाप्रमाणे जपणूक करत चांगले उत्पादन होईल या असे पोटी त्यावर विविध औषधाच्या फवारणी करून उत्पादन कसे वाढवता येईल यावर भर दिला जाते मात्र निसर्ग हा शेतकऱ्याला नेहमीच कुठे ना कुठे अडचणीत आणत असल्याचे दिसते आहे त्यामुळे होणारे नुकसान हा शेतकरी कुठून भरून काढावे या विवंचनेत पडलेला असतो सध्याची परिस्थिती पाहता तुरीचे पीक हे पुलावस्थेत असून जोरदार भरल्याचे दिसते आहे त्यावर शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीच्या किंवा बरोबर उत्पादन होईल या आशा पल्लवीत झाल्या आहेत मात्र ढगाळ वातावरण आणि त्यावर निर्माण होणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव किंवा वेगवेगळ्या रोगाचा सावट यामुळे चिंता वाढली असल्याचे दिसते आहे.
सध्या तूर फुल अवस्थेत आहे आणि उत्पादन चांगले होईल अशी आशा आहे परंतू ढगाळ वातावरण काय करते यावर अवलंबून राहील.
राहूल साबळे, शेतकरी
टिपटाळा
पिकाची परिस्थिती पाहता उत्पादनात वाढ होईल असे वाटते परंतू ढगाळ वातावरणामुळे अळीच्या प्रार्दुभावासह रोगराईचे सावट पसरले तर आशेची निराशा होईल.
सिद्धार्थ समदुरे, शेतकरी
बोर्टा