अकोला - समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक किशोर वाहने यांनी आपल्या आईच्या विसाव्या स्मृती पित्यर्थ व डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मलकापूर येथील सूर्योदय बालगृहामध्ये बालकांना थंडी संरक्षण करण्यासाठी सर्व उपस्थित मुलांना ब्लॅंकेटचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले. तसेच मुलांना फराळाचे वाटप मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये आई-वडिल मरण पावल्यानंतर तेरा दिवस किंवा वर्ष श्राद्ध होईपर्यंत आठवण ठेवणाऱ्या या नव्या पिढी पुढे प्राध्यापक किशोर वाहने यांनी एक आदर्श ठेवला आहे. आईला जाऊन १९ वर्षे पूर्ण झाले असले तरीही आईच्या आठवणीत राहुन दरवर्षी आपल्या आईच्या स्मृति प्रित्यर्थ लहान मुला मुली बालके यांना काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी आपल्या परीने हे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी निराधार निराश्रित मुला मुलींना वस्तूचे वाटप करीत असतात अशा या आईच्या ऋणात राहून सेवाभाव वृत्तीने सेवा करणाऱ्या किशोर वाहने व त्यांच्या परिवारास मनापासून धन्यवाद व त्यांच्या कडून आपण सुद्धा काहीतरी घेऊन पुढील सामाजिक कार्यास योगदान द्यावे अशी नम्र विनंती सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे यांनी जागरूक नागरिकांना केली आहे.