चतुररागिनी ग्रुपचा"सितारों की मेहफिल"हा पंचवार्षिक महोत्सव हर्ष उल्हासात संपन्न

 




मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारा चतुररागिनी हा ग्रुप.या ग्रुपच्या माध्यमातून नुकताच कस्तुरबा हाॅल,माटुंगा पश्चिम येथे"सितारों की मेहफिल "हा पंचवार्षिक महोत्सव मोठ्या हर्ष उल्हासात आणि धुमधडाक्यात पार पडला.चतुररागिनी या ग्रुपच्या माध्यमातून  पार पडलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मुकुट आणि विजयचिन्ह देऊन गौरविण्यात आले.चतुररागिनी ग्रुप च्या अध्यक्षा सौ.शिल्पा देसाई व त्यांच्या टीमने या कार्यक्रमाची फार सुंदररित्या आखणी केली होती.उपस्थित असलेल्या चतुररागिंनी वेगवेगळ्या चित्रपट कलाकारांसारखे हुबेहुब पोशाख करुन त्यांच्या सुपरहिट गाण्यांवर ज्याप्रकारे नृत्य सादर केली की जणू सगळे फिल्मी कलाकारच स्टेजवर अवतरले आहेत.आणि ह्या सगळ्यात लक्षवेधी झाला तो म्हणजे फॅशनवाॅक खूपच सुंदररित्या सादर केला त्यामुळे चित्रपट तारिकांच्या आठवणींना उजाळा मिळाला.पण हे करताना चतुररागिनींनी आलेल्या सगळ्यांचे मनोरंजन ही केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय व संजना राणे ह्या जोडीने उत्कृष्टरित्या सांभाळले,सोबतच ह्या जोडीच्या नृत्याने व इतर चतुररागिनींच्या दिलखेचक नृत्य अदाकारीने कार्यक्रमाची रंगत वाढली.जेणेकरून सितारोकी मेहफिल हे नाव पूर्णपणे सार्थकी ठरले.मराठी सिनेतारका,निवेदिका सेलेब्रेटी पूनम चांदोरकर यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती तर लावलीच पण चतुररागिनी सोबत नृत्याचा आस्वादही घेतला.कार्यक्रमात सगळ्या चतुररागिनींना मिळालेली सुंदर बक्षिसे हे खास आकर्षण ठरले आणि यासाठी विशेषतः ज्वेलरी डिझायनर प्रियांका घारे सोबतच वीणा प्रभू,किरण गौर,शुभांगी घाटणेकर यांनीही स्पाॅन्सरशिप देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविण्यास फक्त हातभारच नाही लावला उपस्थित राहुन चतुररागिनींना मार्गदर्शन करत त्याच्यासोबत नृत्याचा आनंद लुटला.सितारोकी मेहफिल या कार्यक्रमासाठी मुंबई,ठाणे,विरार,कल्याण,पनवेल,नाशिक,अलीबाग तसेच पुण्याहून आलेल्या सगळ्या उपस्थितांनी या मजेदार आणि मनोरंजनाने कार्यक्रमाचा आनंद लुटला आणि विशेष स्वादिष्ट भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post