राज्य लॉटरी दिवाळी भव्यतम सोडतीच्या विक्रमी विक्रीचे आवाहन : सातार्डेकर

 




मुंबई, प्रतिनिधी (गुरुनाथ तिरपणकर)

गेली ५५ वर्षाची तेजस्वी परंपरा असणारी महाराष्ट्र राज्याची राज्य लॉटरी यंदाही बाजारात आली असून पारदर्शक व विश्वासहार्य असलेली ही अधिकृत लॉटरीची विक्रमी विक्री करुन उच्चांक प्रस्थापित करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र भरातील विक्रेते, ग्राहक आणि वितरक या सर्वानी दिवाळी भव्यतम लाॅटरीसाठी आग्रह धरावा आणि वैयक्तिक बक्षिसांसोबतच राज्याच्या विकास कामासाठी त्यातून जो महसूल मिळतो, यासाठी प्रयत्नशील असावे असे स्पष्ट करून सातार्डेकर पुढे म्हणतात, यंदा ग्राहकांसोबत विक्रेत्यांसाठी रोख रकमेची विशेष योजना संघटनेनी सुरू केली आहे. जेणेकरून लॉटरीच्या अर्थचक्रात आलेली मरगळ ही दूर होईल!

लॉटरी विभागाने दिवाळीसाठी विविध आकर्षक बक्षिसांचेही आयोजन केले आहे. दिवाळी भव्यतम लॉटरीची खरेदी हा दिवाळी सणातला एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो ग्राहकांनी अधिकाधिक लॉटरीची खरेदी करावी तसेच विक्रेत्यांनीही याकामी पुढाकार घ्यावा, असेही सातार्डेकर यांनी सांगितले. अडीच लाख तिकीटांची छपाई यंदा करण्यात आली आहे पहिले बक्षीस एक करोड रुपयांचे असुन प्रोत्साहनपर चार बक्षिसे दोन लाखाची, दुसरी पाच बक्षीसे प्रत्येकी पाच लाखाची, तिसरी पाच बक्षीसे प्रत्येकी एक लाखाची यासोबत इतर लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली असून ही दिवाळी सोडत १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता नवी मुंबई लॉटरी कार्यालयात काढण्यात येणार आहे. अजुनही काही तिकीटे शिल्लक असून त्याच्या विक्रीसाठी ग्राहकांपर्यंत आकर्षक पद्धतीने पोहोचविणे बदलत्या काळात जरुरीचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्या विक्रेते, ग्राहक यांना दिवाळी भव्यतम तिकीटे हवी असतील त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

विलास सातार्डेकर (संस्थापक अध्यक्ष) ९८९२८१७५९७

राजेश बोरकर (सरचिटणीस) 

 9004471885 

कमलेश विश्वकर्मा (उपाध्यक्ष) 

८९२८४१२२५८) यावर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post