अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी - निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार

 


 



मूर्तिजापूर - विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी येथील महसूल प्रशासन सज्ज झाले असून मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी आवाहन केले आहे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या कल्पक नियोजनात संपन्न झाला असून या वर्गाला 884 कर्मचारी पैकी 864 कर्मचारी उपस्थित होते 20 गैरहजर होते त्यापैकी 10 कर्मचारी यांची इतर ठिकाणी नियुक्ती झालेली आहे 10 कर्मचारी वैदकीय रजे वर आहे. शुक्रवार (ता.08) व शनिवार (ता.09) दोन सत्रात प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे .





 पहिल्या सत्रा मध्ये तहसीलदार विजय सवडे यांच्यासह तलाठी विशाल काटोले यांनी कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षण हे दोन सत्रात घेण्यात आले प्रात्यक्षीक व मौखीक प्रशिक्षण अंतर्गत निवडणुक कालावधीत आयोगाच्या निकषा प्रमाणे भरुन घ्यावयाचे सर्व नमुने या प्रशिक्षणात भरुन घेण्यात आले तसेच सर्वच कर्मचाऱ्यांनी इव्हीएम हाताळने बाबतचा सराव घेतला "संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. प्रशिक्षण वर्गाचे नियोजन व आयोजन कल्पक आणि शिस्तबद्ध होते. कुठलीही त्रुटी नियोजनात नव्हती, संपूर्ण प्रक्रिया आमचे समाधान होईल, अशा पद्धतीने समजावून सांगण्यात आली", अशा प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केल्या. एलसीडीवर व्हिडिओच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले. कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडावी. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत सावधगिरी बाळगावी. हजेरी पथकाचे काम महसूल कर्मचाऱ्यांनी पाहिले. नायब तहसीलदार उमेश बनसोड व रवी राऊत, जयंत पागृत, देवीदास पडल्लवार, महेश नागोलकर निवडणुक ना तह , संजय इसाळकर, स महसुल अधिकारी अविनाश डांगे , मंडळ अधिकारी आर के पुरी , रामराव जाधव, तलाठी मुकेश गोमाशे , अशोक वाकोडे , गोविंदा चव्हान यांनी आयोजनात पुढाकार घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post