मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे हरिष पिंपळे यांची विजयाची चौकार

 






ऐतिहासीक विजय मिळवत मतदार संघावर पक्षाचे वर्चस्व कायम




मूर्तिजापूर - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. महायुतीला मतदारांनी प्रतिसाद भरभरून मतदान केले असून महायुतीला लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रमाणात आशीर्वाद मिळाल्याचं या निकालातून स्पष्ट झाले आहे. तर महाविकास आघाडीचा महायुतीने सुपडा साफ करत विरोधी पक्षातही बसण्याची संधी दिली नसल्याचे राज्याच्या निकालावरून दिसत आहे.

        राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले असलेल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात निकालाअंती महायुती तथा भाजपाचे उमेदवार हरिष पिंपळे यांनी ९१ हजार ८२० मताधिक्य मिळवून तब्बल ३५ हजार ८६४ मतांच्या फरकाने महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांचा दारून पराभव करत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात सलग चौथ्यांदा विजय प्राप्त करत नोंद केली आहे.



    मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाकरिता २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली या मतदार संघात तिहेरी लढत पाहावयास मिळाली यामध्ये महायुतीचे हरिष पिंपळे, महाविकास आघाडीकडून सम्राट डोंगरदिवे तर वंचीत बहुजन आघाडीचे सुगत वाघमारे यांच्यात अतीतटीची होणारी लढत निवडणूक निकालाअंती एकतर्फी झाली मूर्तिजापूर मतदार संघातपहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले हरीश पिंपळे यांची आघाडी वाढतच गेली २८ व्या फेरीत त्यांना ९१ हजार ८२० मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे यांना ५५ हजार ९५६ मतं तर वंचित बहुजन आघाडीचे सुगत वाघमारे यांना ४९ हजार ६०८ मते प्राप्त होऊन तिसऱ्या स्थानावर राहावे लागले. मूर्तिजापूर मतदारसंघात मूर्तीजापुर , बार्शीटाकळी तसेच अकोला तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे . मराठा , बंजारा मुस्लिम व बौद्ध मतदार यामध्ये सर्वाधिक आहेत .यावेळी बौद्ध मताचे विभाजन झाले तर सर्व समाजाचे एक गठ्ठा मत आमदार हरीश पिंपळे यांना मिळाले. 

आमदार हरीश पिंपळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की माझ्याने काही चुका झाल्या असतील परंतु जनता जनार्दनच माझा आशीर्वाद आहे . संत गजानन महाराजांच्या कृपेने मी चौथ्यांदा निवडून आलो आणि आता लोकांचीच सेवा मी करणार आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात चौथ्यांदा आमदार म्हणून हरीश पिंपळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. प्रमाणपत्र घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गर्दीत जेसीबीवर बसून डिजे ,ढोलताशांच्या गजरात तसेच फटाक्यांची आतिषबाजी करीत मूर्तीजापूर शहरातून आमदार हरीश पिंपळे यांची भव्यदिव्य मिरवणूक शहरभर काढण्यात आली.



चौथ्यांदा आमदार झाल्यावर २०२४ ते २०२९ पर्यंत मतदार संघातील शेतकऱ्यांचे पांदण रस्ते, मूर्तिजापूर शहराचा मुख्य रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रलंबित असलेले मतदार संघातले सर्व बॅरेज (धरण )

, बार्शीटाकळी मूर्तिजापूर मध्ये नवीन प्रशासकीय इमारत, सर्व ग्रामपंचायतीला - ग्रामपंचायत भवन, शिक्षण क्षेत्रात युवकांच्या बेरोजगारी संदर्भात तसेच शेतकरी बांधवाच्या समस्या सोडवीण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल , मतदार संघातल्या नागरिकांच्या प्रलंबित समस्या २०२९ पर्यंत निकाली काढणार असल्याच्या प्रतिक्रिया चौथ्यांदा निवडून आलेले आमदार हरिष पिंपळे यांनी व्यक्त केल्या.


सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतांची यादी..

 

जाणून घ्या कुणाला किती मते 








Tags - #GavakadachiBatmi Maharashtra #India #murtizapurnews #aknews #bjp  #akolanews #मराठीबातमी #आमदार हरिष पिंपळे #भाजपा #विधानसभा निवडणुक #बार्शी टाकळी #नरेंद्रमोदी  #Congress #राहुल गांधी #vba #aap #mns #उध्दव ठाकरे #राज ठाकरे #शिवसेना #मनसे #शरदचंद्र पवार #एकनाथशिंदे #सम्राट डोंगरदिवे #सुगत वाघमारे #बसपा #अकोला #मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ 

Post a Comment

Previous Post Next Post