अचलपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

 




अमरावती : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा करून प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. यासाठी अचलपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन 42-अचलपूर विधानसभा मतदार संघ, निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अरखराव यांनी केले आहे.

            पहिली तपासणी दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, दुसरी तपासणी दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, तिसरी तपासणी दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. तपासणीचे ठिकाण नविन प्रशासकीय इमारत, उपविभागीय अधिकारी कार्यालय, परिसर, अचलपूर येथे राहील.

            जर उपरोक्त दिनांकाला सर्व उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही, तर उर्वरित उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

            42-अचलपूर विधासभा मतदारसंघ, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून द्यावे. तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने कोणत्याही उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.


Post a Comment

Previous Post Next Post