फर्दापुर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मतदार जनजागृती अभियान


 प्रभातफेरीतील उत्स्फूर्त घोषणांनी निनादला परिसर



.सं संभाजीनगर प्रतिनिधी सादिक शेख


छ.संभाजीनगर: फर्दापूर येथे विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १००% मतदान व्हावे याकरिता मतदार जनजागृती अभियानांतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा फर्दापुर तर्फे मतदार जनजागृती होण्याकरिता शनिवार 26 ऑक्टोबर रोजी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.

    प्रत्येक नागरिकांनी मतदान करणे गरजेचे आहे व त्याकरिता शासन विविध स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.लोकशाहीच्या मतदान प्रक्रिया,राष्ट्रसेवेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचाही समावेश असावा अशा उदात्त हेतूने मतदार जनजागृती करिता प्रभात फेरीचे आयोजन करुन निवडणूक विभागाचे आई बाबांचे संकल्पपत्र विद्यार्थ्यांनी पालकांकडून भरुन आणले,तसेच प्रभात फेरीच्या वेळेस गावात मतदार मार्गदर्शिका वाटप करण्यात आल्या.BLO यांनी चुनावी पाठशाळेतील सभासदांची बैठक घेण्यात आली.केंद्रप्रमुख ए एस पोळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

   यावेळी ‘मतदान करा सर्व नर आणि नारी, ही आहे प्रत्येक मतदाराची जबाबदारी’, ‘देशाचे भाग्यविधाते व्हा, नागरिकहो, जागरूक होऊन मतदार यादीत नाव नोंदवा’,‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘वृद्ध असो की जवान, सर्वजण करा मतदान’ अशा जनजागृतीपर घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. 

   शाळेने राबवलेल्या या उपक्रमाबाबत पालकांनीसुद्धा विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.नागरिकांनी यास भरभरून प्रतिसाद दिला.

   केंद्रप्रमुख ए एस पोळ, मुख्याध्यापक डी टी बलांडे,शकील अहमद, संजय बागुल,राजेंद्र सपकाळे,सतिष माळी, संतोष तायडे,संजय सोनवणे,लिलाधर कोळी, केदारनाथ खताळ, अनिल सपकाळ,रुपेश घुले, जितेंद्र नवलाखे,आमेर अन्सारी,याहिया अमान,निलेश कोळी, जयश्री पाटील,सुमेरा बेगम,शैला सोनवणे, उज्वला साळवे, खतिजा बाजी, राजश्री बावस्कर यांनी प्रभातफेरीचे उत्तम नियोजन केले .

Post a Comment

Previous Post Next Post