मूर्तिजापूर - तालुक्यातील खराब खरबडी येथे तलावात पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. २६ रोजी दुपारच्या सुमारास घडली.
सध्या सर्वत्र सोयाबीन सोंगण्याचे दिवस सुरू असल्याने व पुढे तोंडावर दिवाळीचा सण असताना घरची परिस्थिती हालाखीची असल्याने सोयाबीन सोंगन्याच्या थ्रेशर मशीन वर काम करण्याकरिता गेलेल्या मूर्तिजापूर येथील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या आदेश गजानन वाढवे या १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खराब खरबडी येथे शनिवारी दि. २६ रोजी दुपारी १२ ते १२. ३० वाजताच्या सुमारास घटना घडली आहे.
आदेश ह्याची घरची परिस्थिती हालखीची व पुढे दिवाळीचा सन असल्याने दोन पैश्यांच्या आशेने सोयाबीन थ्रेशर मशीनवर काम करण्याकरिता गेला असता काम संपल्यावर गावातील तलावावर आंघोळ करण्याकरिता गेलेल्या आदेश वाढवे याचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिकांनी तलावाकडे धाव घेऊन आदेश चा शोध सुरु केला दरम्यान तलावतील एका गाळात आदेश चा मृतदेह अडकल्याच्या अवस्थेत दिसून आला.
मृतदेह गाळातून काढून गावकऱ्यांनी मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे आणला मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.