मोर्शी/प्रतिनिधी : शिरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर येथे दिनांक 15/10/2024 ला दुर्गा देवी विसर्जन मिरवणूक डिजे, ढोल ताशा च्या गजरात काढण्यात आली, यामध्ये दोन दुर्गा देवी मंडळ व तिन शारदा मंडळ विसर्जन मिरवणूक मधे यंगस्टार दुर्गा उत्सव मंडळ व सनातन शारदा मंडळ च्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाच्या सन्मानार्थ मिरवणुकीत झळकविलेले पोस्टर ने गावातील सर्व भाविक भक्तांचे लक्ष वेधले, शिरखेड पोलिस स्टेशन चे ठाणेदार सचिन लुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन शिरखेड चे सपोनि राहुल गवई साहेब, पोस्टे खुपीया वैभव घोगरे,बिट जमादार संजय वाघमारे, नितेश वाघ राजिक खान, पंकज चौधरी, अमित राऊत, गजानन तिजारे तसेच QRT पथक अमरावती ग्रामीण यांनी शांततेत दुर्गा देवी विसर्जन शांततेत पार पाडले..