जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) : नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल फर्दापुर येथे सिरतून नबी(स.स.)कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामा मस्जिद फर्दापुर येथील इमाम कादरी अलीम अहेमद हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्दू गर्ल्स प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक सय्यद अब्दुल कय्युम सर तसेच डॉ. अब्दुल रहीम,कादरी फारूक अहेमद,फारूक मुल्ला,हाजी शेख यूनुस,पठाण महबूब खान,पठाण आसिफ खान ,कादरी समीम अहेमद,शेख वसीम शेख मुस्तफा,मोईझ खान,शेख फ़ेरोज़ शौकत,शेख सादिक पत्रकार,अख्तर काझी शेख जावेद शेख पाशू शेख इरफान शेख शौकत शेख हक्कानी पत्रकार,रिजवान,अबरार, हे होते पंच म्हणून सय्यद अर्शद, आसिफ खान,सय्यद जाहेद यानी काम पाहिले प्रस्ताविक भाषणात मुख्याध्यापक शेख वाजेद सर यांनी सिरतून नबी (स.स.) कार्यक्रमाचे महत्व विषद केले.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यानी मोहम्मद स.स. यांचे जीवन व हेतू यावर बोलताना त्यांच्या जीवनातील अनेक पैलू चा उलगडा केला .मोहम्मद स.स. चे जीवन त्यांनी लोकांना दिलेली शिकवण, त्यांचे व्यवहार,त्रास देणाऱ्यांना माफ करण्याची वृत्ती,त्यांचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणले तर आपले जीवन नक्कीच फलदायी होते असेही विद्यार्थ्यांनी आपल्या तकरीर मध्ये स्पष्ट केले काही विद्यार्थ्यांनी नात सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवून कार्यक्रम मंत्रमुग्ध केले अध्यक्षीय भाषणात कादरी अलीम अहेमद यांनी मोहम्मद स.स. यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांची प्रत्येक कृती आपल्या जीवनात आचरणात आणुन आपण आपले जीवन यशस्वी करू शकतो असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण अब्दुल राजिक सर यांनी केले तर जेष्ठ शिक्षक शेख जुबेर अहमद यांनी आभार प्रकट केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी झाला..