चंद्रपूर ,वरोरा : दिनांक ३० सप्टेंबर २०२४ ला पोषण आहार माहचा बक्षीस वितरण समारंभ समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सप्टेंबर माह हा पोषण आहार माह म्हणून आहाराबाबत मार्गदर्शन जनजागृती प्रचार व प्रसार करण्यात आला होता.
या समारोपिय कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधिक्षक, वंदना विनोद बरडे अधिसेविका डॉ झाकिर युनानी तज्ञ,गितांजली ढोक आहारतज्ञ उपस्थित होते.महीनाभर वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.रांगोळी स्पर्धा, बाॅनर, पोस्टर, रेसिपी स्पर्धा घेण्यात आल्या.
रेसिपी स्पर्धा मध्ये स्वाती जूनारकर ए.एन.एम.शिष्टर प्रथम क्रमांक ज्वारीचे अप्पे रेसिपी, दुसरा क्रमांक वंदना विनोद बरडे अधिसेविका यांचा यांनी मिक्स कळधान्य ज्वारी,बाजरी,नाचणि, रागी, तांदूळ, सोयाबीन यांच्या पिठाची भाकरी,मीक्स भाजी यामध्ये गवार शेंग,चवळी शेंग,कोहळ,दोळका,वांग, टमाटर,सातू मिठाई,सलाद,अनार दाना,मिक्स कोंब आलेली उसळ यामध्ये मेथी,मूंग,मोट,अशी कलरफुल डिश, पारंपारिक पद्धतीने व शेंद्रीय पध्दतीचे खात व हात घाणीचे मोहरीचे तेल वापरून पौष्टिक व सर्व पोषक घटकांनी युक्त रेसिपी केली होती.
तिसरा क्रमांक मिना मोगरे अप यांचा यामध्ये भात, भाजी, पोळी,अंडे आम्लेट,राजमा व सोयाबीन वळी भात होता.काही लाभार्थी यांनी सुद्धां भाग घेतला होता.त्यांनाही बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या महिनाभर वंदना विनोद बरडे अधीसेवीका व गितांजली ढोक आहारतज्ञ यांनी आहाराबाबत मार्गदर्शन जनजागृती प्रचार व प्रसार करण्याचे काम केलें व आवाहन केले.या कार्यक्रमासाठी सर्वांनी मेहनत घेतली व मदत केली.डाॅ . प्रफुल्ल खूजे, वंदना बरडे यांनी मार्गदर्शन केले.
तर प्रास्ताविक गितांजली ढोक यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली राईसपाईले आणि आभारप्रदर्शन विजया रूयीकर यांनी केले.
Tag : #चंद्रपूर #वरोरा #आरोग्यविभाग #रेसिपीस्पर्धा #परीक्षा #मार्गदर्शन #वंदनाबरडे #अधिसेविका #उपजिल्हा #रुग्णालय #मराठीबातमी #गावाकडचीबातमी #gavakadachibatmi #Google #Facebook #youtube #पोषणआहार #जनजागृती #प्रचार #प्रसार