पाक्षिक आदर्श रायगड या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीचा तृतीय वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न

 


अंबरनाथ(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-पत्रकारितेत तंत्रज्ञानामुळे बरेच बदल झाले आहेत.तरी गत पत्रकारितेचे गमावलेले स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी जे कष्ट घ्यायला हवेत ते कोणी घेण्याचा प्रयत्न करत नाही,पत्रकारिता करताना सेवा हा धर्म समजून समाज्याच्या मुलभुत प्रश्नांवर लेखणीतुन प्रकाश टाकणारे आणि पत्रकारितेची तत्वे व मुल्ये जपण्याचा निर्धार व्यक्त करणारे या क्षेत्रात अधिक व्हायला हवेत असे आवाहन मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे अंबरनाथ येथे आयोजित पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीचा तृतीय वर्धापनदिनी केले.कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून केली,भक्ती/संगीत गीतांनी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली आणि पारंपरिक लोकगीत सादर करुन नृत्य सादर करण्यात आले.यावेळी कोकण विभाग पदवीधर शिक्षक आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही आदर्श रागडला मार्गदर्शन करताना हे पाक्षिक साप्ताहिक त्यानंतर त्याचे दैनिक व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आणि या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समाज उपयोगी बातम्या देवून सामाजिक बांधिलकी जपावी आणि समाज जागृती करावी असे संबोधित केले. तसेच गुरुपुत्र,गुरुवर्य श्री.उमेश महाराज शेडगे यांनी सणस परिवाराबद्दल गौरवास्पद उदगार काढले,आणि वृत्तपत्राला आणि वृत्तवाहिनीला भरभरून आशिर्वाद दिले.याप्रसंगी प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.प्रेरणा गावकर-कुलकर्णी यांनी देखील शुभेच्छा देताना मोलाचे मार्गदर्शन केले.नगरसेवक तुळशीराम चौधरी यांनी देखील प्रबोधनात्मक भाषण केले.व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी प्रबोधन करुन शुभेच्छा व भरभरून आशिर्वाद दिले.संपुर्ण महाराष्ट्रातुन सांस्कृतिक,सामाजिक,शैक्षणिक,कला,क्रीडा,पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील भरीव कार्य करणा-या६५मान्यवरांना आदर्श रायगड२०२४पुरस्काराने गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपादक रमेश सणस,कार्यकारी संपादक शैलेश सणस,उपसंपादक अविनाश म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.अनेक मान्यवरांनी व उपस्थित पुरस्कर्त्यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व आशिर्वाद दिले.या अतिशय सुंदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिव्या गावकर यांनी केले.उपसंपादक अविनाश म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post