अकोला - राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून तर आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत129 उमेदवारांनी 180 अर्ज अर्ज दाखल केले.
निवडणूक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, अकोट मतदारसंघात आज 20 उमेदवारांनी 25 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 22 उमेदवारांनी 30 अर्ज दाखल केले.
बाळापूर मतदारसंघात आज 19 उमदेवारांनी 24 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 29 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले.
अकोला पश्चिम मतदारसंघात आज 19 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 23 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले.अकोला पूर्व मतदारसंघात आज 16 उमेदवारांनी 21 अर्ज दाखल केले.. आतापर्यंत 23 जणांनी 37 अर्ज दाखल केले.मूर्तिजापूर मतदारसंघात 26 उमेदवारांनी 31 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 32 व्यक्तींनी 38 अर्ज दाखल केले.
-------------------------------------------------------
असे आहेत जिल्हातील विधानसभा मतदार संघनिहाय उमेदवार
1 ) मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ
मूर्तिजापूर मतदारसंघात किशोर ज्ञानेश्वर तायडे (अपक्ष), पंकज सावळे (अपक्ष), सिद्धार्थ डोंगरे (अपक्ष), सुनील वानखडे (अपक्ष), सचिन कोकणे (रिपाइं- ए), रवींद्र पंडित (अपक्ष), सुगत वाघमारे (वंबआघाडी दोन अर्ज), पुष्पाताई महादेवराव इंगळे (अपक्ष), अंकिता राजू शिंदे (अपक्ष), हरिश पिंपळे (भाजप दोन अर्ज), रवी राठी (अपक्ष दोन अर्ज), संतोष इंगळे (अपक्ष), राजकुमार नाचणे (अपक्ष दोन अर्ज), श्रावण खंडारे (पीपल्स पार्टी- डे.), दयाराम घोडे (अपक्ष), यशवंत इंगोले (अपक्ष), गोपाळराव कटाळे (अपक्ष), भाऊराव तायडे (अपक्ष), विनोद सदाफळे (अपक्ष), राजश्री खडसे (अपक्ष), अरूण गवई (अपक्ष), महेश घनगाव (अपक्ष), महादेव गवळे (अपक्ष), गजानन वजीरे (अपक्ष), सम्राट सुरवाडे (एमआयएम), भिकाजी अवचार (मनसे), वंदना वासनिक (रिपाइं – ए)
2) अकोट मतदारसंघ
अकोट मतदारसंघात दिवाकर गवई (अपक्ष), महेश गणगणे (काँग्रेस चार अर्ज), ॲड. सुजाता वानखडे (बसपा), अन्सारउल्लाह खान (अपक्ष), रामकृष्ण ढिगर (अपक्ष), दीपक बोडखे (वंबआघाडी तीन अर्ज), गोपाळ देशमुख (अपक्ष), गजानन महाले (अपक्ष), गजफ्फर खाँ मुजफ्फर खाँ (अपक्ष), ललित बहाळे (अपक्ष), रामप्रभू तराळे (अपक्ष), देवेंद्र पायघन (अपक्ष), नितीन वालसिंगे (अपक्ष), सय्यद यावरअली (अपक्ष), सुनील डोबाळे (मनसे), प्रकाश भारसाकळे (भाजप), अ. सादिक अ. खालिक (अपक्ष), सय्यद मुजीब उर रहमान (अपक्ष), सुभाष रौंदळे (अपक्ष), यशपाल चांदेकर (पीपल्स पार्टी डे.)
3) बाळापूर
खतीब सय्यद नातिकोद्दीन यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे चार अर्ज, अमोल घायवट (अपक्ष), राजनारायण रतन कांबळे (अपक्ष), शे. कलीम शे. मजीद (अपक्ष), नितीन देशमुख (अपक्ष), रमेश उभे (अपक्ष), राजेश दादाराव देशमुख (अपक्ष), अनिल तेजा (अपक्ष), श्रीकृष्ण घ्यारे (अपक्ष), सुनील शिरसाठ (अपक्ष), बळीराम शिरस्कार (शिवसेना), सुरेश डोंगरे (अपक्ष), श्रीकृष्ण अंधारे (अपक्ष), शिवकुमार बायस (अपक्ष), राजकुमार शेळके (अपक्ष), प्रमोद कदम (अपक्ष), मंगेश गाडगे (मनसे), रईस अहमद (अपक्ष), संजय फाटकर (अपक्ष), प्रकाश डिवरे (अपक्ष), प्रमोद पोहरे (अपक्ष)
4) अकोला पूर्व
अकोला पूर्व मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर 2 अर्ज , सुभाषचंद्र कोरपे अपक्ष 2 अर्ज, गणेश गिरी (अपक्ष),विशाल भगवान पाखरे (अपक्ष), बहुजन समाज पार्टीकडून हर्षल देवानंद दामोदर, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक कडून जीवन पुनाजी गावंडे, भानुदास कांबळे (अपक्ष), संजय गोपाळराव आठवले दोन अर्ज (अपक्ष), वंचित बहुजन आघाडी कडून ज्ञानेश्वर सुलताने, विजय श्रीकृष्ण मालोकार (अपक्ष), सुधाकर फुलचंद पवार (अपक्ष), डॉ संतोष श्रीकृष्ण हूसे (अपक्ष), शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून आशिष रामराव दातकर तीन अर्ज ,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून देवश्री किशोर ठाकरे, संजय वानखडे (अपक्ष), राष्ट्रीय समाज पक्षाकडून आनंद गोठकडे
5) अकोला पश्चिम
अकोला पश्चिम मतदारसंघात विजय अग्रवाल (भाजप- दोन अर्ज), सुमंत तिरपुडे (पी. पार्टी ऑफ इंडिया डे.), सुनील शिरसाठ (अपक्ष), मो. सोहेल मो. हुसेन (सोशल डेमॉ. पार्टी), प्रशंसा अंबेरे (मनसे), राजेश मिश्रा (शिवसेना (ठाकरे) आणि एक अपक्ष), संजय बडोणे (अपक्ष), हरिश आलिमचंदानी (अपक्ष), दिनेश श्रीवास (लोकतांत्रिक जनाधार पक्ष आणि एक अपक्ष), भगवान दंदी (अपक्ष), मदन भरगड (अपक्ष), साजिद खान म. खान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 3 अर्ज), अशोक ओळंबे (प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज), राजेश वर्मा (अपक्ष), बन्सीलाल प्रजापती (अपक्ष), जिशान हुसैन (वं. ब. आघाडी), प्रकाश डवले (अपक्ष-2 अर्ज) भरतकुमार मिश्रा (अपक्ष), नंदकिशोर ढोरे (अपक्ष), मिर्झा इम्रान बेग (रासप) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.