सुमित एजन्सीचा महाविक्रम-५०लाखाची गणेशोत्सव बंपर लाॅटरी अंधेरीच्या विकास लाॅटरीने जिंकली

 



मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-महाराष्ट्र राज्य लाॅटरीची गणपती भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर झाला असून मुंबईच्या सुमित एजन्सीला(प्रिन्स एजन्सी मार्फत)५०लाख रुपयांचे पहिले बक्षिस मिळाले आहे.महाराष्ट्रातील नामांकित सुमित एजन्सीने पुन्हा एकदा बक्षिसांचा हा महाविक्रम केला आहे.महाराष्ट्र राज्य लाॅटरीला एक परंपरा असून यंदाचे ५५ वे वर्ष आहे.गणेशोत्सवातील लाॅटरीला ग्राहकांच्या मनात श्रध्देचे व विश्वासाचे स्थान असून सुमित एजन्सीने आजवर शासनाच्या या अधिकृत लाॅटरीचा पुरस्कार केला आहे.सुमित एजन्सी तर्फे वितरक प्रिन्स एजन्सी,अंधेरी येथील विक्रते विकास लाॅटरी सेंटर,आणि विजेत्या ग्राहकाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.शुक्रवारी नवी मुंबई येथील लाॅटरी सोडत सभागृहात सोडत काढण्यात आली असून ग्राहक,विक्रेते,ठेकेदार यांच्यात निकलाबद्दल कुतूहल होते निकाल जाहीर झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरया च्या उत्स्फूर्त घोषणा देण्यात आल्या.५०लाखाचे पहिले बक्षिस सुमित एजन्सी सह दुसरी एक लाखाची५बक्षिसे असून सर्वस्वी दादर येथील गणेश एजन्सी,हरी श्री लाॅटरी सेंटर नालासोपारा,कोल्हापूर येथील महावीर लाॅटरी सेंटर,आणि बोरीवली येथील वैशाली लाॅटरी सेंटर यांना मिळाले.अन्य लाखो रुपयांची बक्षिसे सोडतीतून जाहीर करण्यात आली.


Tag: #gavakadachiBatmi #network #Mumbai #Maharashtra #India #मुंबई #मराठी #बातमी #गावाकडचीबातमी 

Post a Comment

Previous Post Next Post