शिवरायांचा पुतळा पडल्याचा जाहीर निषेध...
दोषींवर तात्काळ कारवाई करा..शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनची मागणी...
नंदुरबार-छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग शेजारी राजकोटवर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही बाब अत्यंत संतापजनक आहे. या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात येत असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, या घडलेल्या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेत तीव्र संताप असून मोठ्या प्रमाणावर शासन-प्रशासनाविरोधात असंतोष निर्माण झालेला आहे. या घडलेल्या घटनेचा समस्त नंदुरबार जिल्हावासियांच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. या घटनेची गांभीर्याने दखल घेवून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व त्यांचे प्रशासकीय सहकारी या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करुन गुन्हे नोंदविण्यात यावेत, अशी मागणी आमच्या सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. या बाबीचा गांभीर्याने विचार होवून शासन स्तरावरुन तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, उपाध्यक्ष लाला बागवान, सचिव इरफान मोमीन, कार्याध्यक्ष आरीफ काकड, सदस्य फैजान गुलाब, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, उपाध्यक्ष आप्पा वाघ, सामाजिक कार्यकर्ते गौतम इंदवे आदींनी केली आहे.
Tag : नंदुरबार #शहीद_टिपू_सुलतान_फाऊंडेशन #महाराष्ट्रपोलीस #छत्रपती_शिवाजी_महाराज #खानदेश #गावाकडचीबातमी #Nandurbar #gavakadachibatmi #MarathiBatmi #महाराष्ट्र #Maharashtra #India
गावाकडची बातमी साठी आजचं आमच्या चैनलला सबस्क्राईब करा..👇
https://youtube.com/@gavakadachibatmi?si=eaiH9FQSon4E9v30