चंद्रपूर,वरोरा : दिनांक ९ आगष्ट २०२४ ला प्रधानमंत्री योजने अंतर्गत गरोदर मातांची तपासणी केली जाते.
याअनुषंगाने कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व वंदना योजनेचे लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
वंदना विनोद बरडे अधिसेविका यांनी गरोदर मातांना सि. सि .पि .प्रोग्राम विषयी मार्गदर्शन केले.
तसेच त्या दिवशी ईम्युनायझेन दिवस होता. लहान बाळांच्या आई वडिलांना सि .सि. पि. प्रोग्राम विषयी मार्गदर्शन तसेच एन. सि. डि .मध्ये आलेल्या लाभार्थी यांनी सि. सि. पि. प्रोग्राम विषयी मार्गदर्शन केले.
रत्नमाला ढोले ए. एन. एम . आरोग्यसेविका यांनी लसीकरणाची माहीती दिली.किरण वांढरे यांनी जेवणाची थाळी ची माहिती दिली.स्वाती किर्तने यांनी लागणार्या कागदपत्रे यांची माहिती देण्यात आली.
वंदना बरडे यांनी प्रधानमंत्री योजने विषयी मार्गदर्शन केले यावेळी सर्व आरोग्य विभाग पदाधिकारी उपस्थित होते.