ठाणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर(-आज सर्वच मित्र-मैत्रिणी साठी ओलांडून आपल्या सर्व जबाबदा-या यशस्वीपणे पार पाडुन आज्जी-आजोबांचा आनंद घेत आहेत.या वयात मित्रांच्या सानिध्यात असल्यामुळे एक स्फुर्तीदायक आनंदी ऊर्जाच मिळत असते.असाच एक अविस्मरणीय क्षण आम्हाला अनुभवायला मिळाला.एस.एम.हायस्कूल,कणकवली येथील आमच्या 1976च्या बॅचचा मित्र संदीप कदम शालेय जीवनानंतर तब्बल ४८वर्षांनी भेटला.संदीप कदम यांनेच ही भेट घडवून आणली.काही दिवसांपूर्वी संदीप कदम याने कणकवली येथे नंदु आळवे,संजय पाध्ये,प्रसाद देसाई,भरत तोरसकर,शेखर ओरसकर आदी मित्रांची आपणहून भेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.मुंबईतील मित्रांची भेट व्हावी हे संदीप कदमला मनोमन वाटत होते,त्याच अनुषंगाने नुकताच रंगला हाॅटेल,कोठारी कंपाऊड,ठाणे येथे डाॅ.संदीप कदम यांनी छोटेखानी गेटुगेदरचे आयोजन केले होते.
हे छोटेखानी गेटुगेदर अविस्मरणीय असेच होते.आमच्या एस.एम.हायस्कूलचा 1976च्या बॅचचा विद्यार्थी डाॅ.संदीप कदम प्रथमच ४८वर्षांनी भेटला.संदीपने केलेले आदरातिथ्य स्वप्नवतच होते,आम्ही प्रथमच भेटत होतो पण जणु काही आम्ही सातत्याने संदीप ला भेटतच होतो असे सर्वांना मनोमन वाटत होते.कीत्येक वर्षांनी भेटत असलो तरी जन्मजन्मांतरीचे ऋणानुबंध मित्रत्वाचे नाते घट्ट होते.याप्रसंगी सर्वांनीच आपल्या शालेय जीवनापासुन ते आत्ता आज्जी-आजोबांपर्यंतचा प्रवास कथन केला.तसेच डाॅ.संदीप कदम यांनेही कठीण परिस्थितीतुन कसा गेलो,उच्च शैक्षणिक वाटचाल कशी झाली हे सविस्तरपणे सांगितले.आता या घडीला स्वतःचे सुसज्ज असे स्वतःचे ठाणे येथे हाॅस्पिटल आहे.
बाल रोग तज्ञ म्हणून डाॅ.संदीप कदम ठाणे शहरात परिचित आहेत.सामाजिक क्षेत्रातही योगदान आहे.तसेच वेगवेगळ्या रोटरी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनवर डाॅ.संदीप कदम कार्यरत आहे,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.छोटेखानी गेटुगेदरच्या अनुषंगाने अशोक चिंदरकर,प्रदीप काणेकर,भारती वर्दम,शहाबुध्दीन काझी,रेखा नाईक,अंजेलिका डिमेलो,सुनिता सावंत,रोहिणी खोत,गुरुनाथ तिरपणकर या सर्वांच्यावतीने डाॅ.संदीप कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच डाॅ.संदीप कदम यांनीही सर्वांना भेटवस्तू व गुलाब पुष देऊन सन्मानित केले.गेटुगेदरचे आयोजन डाॅ.संदीप कदम यांनी लिलया पार पाडले.मित्र-मैत्रिणींना आमंत्रित केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.शेवटी सर्व कणकवलीकर व मुंबईकर मित्र-मैत्रिणींकडुन डाॅ.संदीप कदम यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.