वृध्दाश्रमाची वाढती गरज आणि त्याहून त्याना मुलभूत सुविधापासून वंचित ठेवण्याची क्रुर मानसिकता हे प्रोग्रेसीव समाजासाठी लांच्छानास्पद आहे.. इति गजानन फडकले.

 




डोंबिवली (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

"काय, आपण प्रगतीच्या नावाखाली आपली भारतीय संस्कृती व जीवनमूल्ये नामशेष करणार आहोत का? एकेकाळी ज्यांचा खांद्यावरून आजचा पिढीने भरारी घेतली ते आपल्या घरट्याला विसरलेत काय?" असा ज्वलंत सवाल सेवा समाधान फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन फडकले यांनी काढले.

रविवार 11ऑगस्ट रोजी संस्थेतर्फे डोंबिवली जिल्हा ठाणे येथील मतिमंद अंध मुक बधीर मुलाचे अस्तित्व वसतीगृह व साधना आधार वृध्दाश्रम केंद्राला मूलभूत साहाय्य वितरण समारंभात बोलताना त्यानी हे उदगार काढले. *"ज्या आईवडील आजीआजोबानी आयुष्यभर आपल्या मुलांचा कष्टाने सांभाळ केला व त्यांचे करियर करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली, त्यांनाच त्यांची मुले उतारवयात अडगळीत टाकतात हे चिंताजनक आहे. त्यानी पुढे म्हटले, "हीच समस्या मतिमंद अंध मुक बधीर मुलांच्या वसतीगृहाची सुध्दा आहे. या मुलांना जन्म देणारे आईवडील, कुटूंबिय व समाज स्वीकारत नाही हे अधिकच भीषण वास्तव आहे." तसेच त्याना उभरत्या वयात योग्य शिक्षण व रोजगाराची संधी दिल्या जात नाही हे पाहून वाईट वाटले. समाजधूरीण व समाजतज्ञानी यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. 




     या पार्श्वभुमीवर त्याना आधार व पालनपोषण देणारे समाजसेवी अस्तित्व संस्था व साधना आधार केंद्र यांचे कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे. याकरिता काही सामाजिक संघटना कुवतीप्रमाणे हातभार लावतात. परंतू हे प्रमाण अल्प आहे, यासाठी त्याना समाजातील सर्वच स्तरातून मदत झाली पाहिजे" असे आवाहन अध्यक्ष गजानन फडकले यानी याप्रसंगी केले.

यावेळी सेवासमाधान तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचे नेतृत्व विश्वस्त संदीप राऊळ. मानसी मोने कार्यकारी सदस्य श्रृतिका तारी,  संजय सकपाळ यांनी केले. तर उपस्थित सहकारी  समिधा पवार,  अशोक फडकले,  उदय घाणेकर व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. 

   या सर्वानी गरजूना अन्नधान्य शिधा, सोलापूरी चादरी, टॉवेल्स बिस्किटे, खेळाचे साहित्य व इतर आवश्यक वस्तूचे वाटप केले. याचे सुत्र संचालन व व्यवस्था कु. मिताली मोने यांनी पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी अस्तित्वचे रेक्टर सौ. खामकर व देव्हारे मॅडम आणि साधना केंद्राचे प्रमुख सौ. थत्ते मॅडम यानी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post