श्रीकांत राऊत यवतमाळ
महागावच्या छोट्या मृण्मयीने शहराचे नाव रोशन केले आहे. रुक्ष वाटणाऱ्या गणित या विषयात तिने असामान्य प्रतिभा दाखवित चक्क महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड परिक्षेत गणित या विषयामध्ये तिने आपल्या अलौकिक गुणवत्तेने सर्वांनाच प्रभावीत केले असून महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा गौरव प्राप्त केला आहे. मृण्मयी ही मनोज दिपक सुरोशे यांची सुकन्या. मनोज सुरोशे हे दैनिक बाळकडू या वृत्तपत्राचे विदर्भ प्रतिनिधी असून ते महागाव तालुका पत्रकार महासंघाचे सदस्य आहेत. इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड परिक्षेत राज्यातून प्रथम आल्याबद्दल आल्याबद्दल गोल्ड मेडल आणि स्कॉलरशिप देऊन मृणालीचा सत्कार करण्यात आला. मृण्मयी आमणी (महागाव) येथील एल.के. इंग्रजी उच्च माध्यमिक विद्यामंदिरात इयत्ता दुसरी मध्ये ज्ञानार्जन करीत आहे. मृण्मयी सोबतच, धनश्री कदम इयत्ता पहिली,
शौनक लिमजे इयत्ता पहिली,अर्णव उके इयत्ता तिसरी, समर्थ भोने इयत्ता पाचवी आणी प्रीतम हेडे इयत्ता आठवी यांनीही विशेष पुरस्कार प्राप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू आणि ऑलम्पिक मेडल विजेत्या पी.टी.उषा यांच्या सहीचे प्रमाणपत्र, गोल्ड मेडल आणि शिष्यवृत्ती चा धनादेश देऊन मृण्मयीचा सत्कार करण्यात आला. तिच्या या अलौकिक यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
तिला शाब्बासकीची थाप आजी आजोबा दुर्गा दीपकराव सुरोशे, मम्मी पप्पा सौ राणी मनोज सुरोशे, काका काकू सौ मनिषा रवींद्र सुरोशे, मामा आत्या मंजुषा संदिपराव नांगरे पाटील, आत्त्या अंजुषा सूरज इंगोले, स्मित निकुंज, रीयांश, गार्गी, यांनी मृण्मयी चे अभिनंदन केले.
Tag : #gavakadachibatmi #Marathi #गावाकडचीबातमी #यवतमाळ