आरक्षण वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विरोधीपक्षनेता विजय वडेंटीवार यांचा मातंग समाज मेळाव्यात जोडे चपला दाखवून निषेध

 


लहुजी शक्ती सेना सकल मातंग समाज संघटनेच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील बालाजी मंगलम येथे मातंग समाजाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचा सत्कार तसेच लहुजी शक्ती सेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांचा नागरिक सत्कार मातंग समाजाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथे घेण्यात आला. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

     गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाला उपेक्षित ठेवण्यात काँग्रेस पक्षाचा कसा हातखंडा आहे. हे आपल्या वक्तव्यातून मातंग समाजाचे आमदार अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी आपल्या भाषणांमधून मांडले. 

       लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांनी मातंग समाजाचा इतिहास आपल्या शब्दातून विशद केला. 

काही दिवसापूर्वी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मातंग समाजाची गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली संघर्ष लढाई म्हणजे मातंग समाजाला आरक्षणात वर्गीकरण करून अ ब क ड असे आरक्षण मिळाले पाहिजे अशी एक मुखी मागणी मातंग समाजाच्या सर्व संघटनांची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. 



न्यायालयाने निकाल देऊन आरक्षण वर्गवारी करावी या मागणीचे समर्थन केले असताना काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या मागणीला आमचे सरकार आल्यास आम्ही विरोध करू असे वक्तव्य केल्याने संतप्त मातंग समाज व लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोडे चपला हातात घेऊन विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. 

      या मेळाव्याला लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे, धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड मातंग समाजाचे आमदार अमित गोरखे, लहुजी शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष डॉक्टर रुपेश खडसे , लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज जाधव ,लहुजी शक्ती सेनेचे विदर्भ समन्वयक अनिल सोनटक्के ,महानगरप्रमुख गौरव  गवळी, रणजीत पाटेकर राज्य कार्यकारणी सदस्य लहुजी शक्ती सेना ,उपजिल्हाप्रमुख उमेश भुजाडणे, तालुका अध्यक्ष विनोद तिरले, अनुसूचित जाती मोर्चाचे योगेश अंभोरे,  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लहुजी शक्ती सेना  पत्रकार संतोष वाघमारे, बाळासाहेब स्वर्गीकर ,उमेश हिवराळे, गजानन भाऊ ताकतोडे, भारत खडसे ,गौरव वानखडे तालुका प्रसिद्धीप्रमुख लहुजी शक्ती सेना, निलेश वानखडे ,वसंतराव वानखडे, अनिल वानखडे दत्तापूर, शंकर वानखडे मंगरूळ दस्तगीर, दुर्गेश वानखडे हनुमंता वानखडे इंगोले पेठ रघुनाथपूर, तसेच नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यातील लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व मातंग समाज कार्यकर्ते व महिला हजारोच्या संख्येत उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post