किनवट येथे जरांगे पाटील यांचा वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
किनवट : पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. जागतिक तापमान वाढीपासून वाचायचे असल्यास वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संवर्धन करणे हा एकमेव पर्याय आहे. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व्ही आर. गार्डन किनवट येथे मनोज जरांगे पाटील समर्थक, वृक्षमित्र टीम, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
एक वृक्ष लावुन मनोज जरांगे पाटील यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येऊन वृक्ष मोठा होई पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करुया तरच आपल जिवन अमुल्य प्रदुषण मुक्त होईल व शुध्द हवा मिळु शकेल. ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात मिळेल.
वृक्षारोपण वृक्षसंवर्धन "एक वृक्ष आरोग्य स्वस्थ" चला आज पासून संकल्प करुया एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करुया. ही संकल्पना घेऊन मनोज जरांगे पाटील समर्थक, वृक्षमित्र टीम, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाला बहुसंख्येने वृक्ष प्रेमी उपस्थित होते.