तहसीलदार ,कृषी अधिकारी तलाठी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक पिंकांचे पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर
चंद्रपूर : चिमूर तालुक्यात 20 जुलैला तसेच 22 जुलैला भयानक अतिवृष्टी झाली यात शेतकऱ्यांचे पीक पाण्यात वाहून गेले तर काही पिके हे पाण्याचा निचरा न झाल्याने सडून नष्ट झाले अश्या पिकांची पाहणी व पंचनामा करण्यासाठी चिमूर तालुक्याचे महसूल विभाग आणी कृषी विभाग नेरी जवळील खुंटाला येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले असून दि 25 ला पाहणी करून पंचनामा केला.
चिमूर तालुक्यात मागील पाच दिवसापासून संततधार मुसळधार पाऊस पडत असून यामुळे नदी नाले तलाव तुडूंब भाल्याने नदीला नाल्याना मोट्या प्रमाणात पूर आले त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होऊन या पाण्याने भात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले काही पीक वाहून गेले तर काही पाण्यामुळे सडले त्यामुळे शेतकऱ्यावर आभाळ कोसळले असून सततच्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे याशिवाय तूर सोयाबीन कापूस पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे.
सदर पिकाच्या नुकसानीची दखल महसूल विभाग तसेच कृषी विभागाने घेतली असून पिकांची पाहणी करण्यासाठी स्वतः तहसीलदार राजमाने साहेब तालुका कृषी अधिकारी डी ए तिखे कृषी पर्यवेक्षक आर के निखारे कृषी सहायक येसनकर तलाठी ठाकरे कोतवाल चौधरी आदींसह महसूल व कृषी विभाग कर्मचारी यांनी खुंटाला येथील नुकसानग्रस्त शेतकरी बालाजी सोनवाणे वासुदेव गुरनुले रामटेके यांच्या शेताला भेट देत पाहणी करीत नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा केला यावेळी शेतकरी सरपंच मॅडम उपसरपंच विनोद बारसागडे भीमराव गुरनुले आणि अनेक शेतकरी उपस्थित होते.