मोर्शी:- जिल्हा परिषद मुलांची शाळा नेरपिंगळाई येथे वर्ग एक ते सात पर्यंत वर्ग आहे या सर्व वर्गांमधून 11 सदस्य निवडीची निवड प्रक्रिया दिनांक 24 जुलै रोजी पार पडली त्यामधून अध्यक्षाची निवड प्रक्रिया करण्यात आली.
यामध्ये नितीन नेवारे आणि प्रवीण पाचघरे हे अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून रिंगणात होते नितीन नेवारे यांना चार मते तर प्रवीण पाचघरे यांना सात मते मिळाली तसेच उपाध्यक्ष पदासाठी पल्लवी निलेश भोजने आणि अलका ज्ञानेश्वर टिंगने या रिंगणात होत्या अलका टिंगणे यांना चार मते आणि पल्लवी भोजने यांना पाच मते मिळाली या निवडणुकीत प्रत्येकी दोन निरंक आणि एक अवैद्य मत ठरविण्यात आलं संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही हसत खेळत वातावरणात शांततेत पार पडली निवडणूक अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय खंडारकर प्रमुख पाहुणे मीनल भोजने तसेच दिलीप बघेकर हे होते संचालन सुनील डेहनकर यांनी केले तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन निंगोट यांनी काम पाहिले यामध्ये सर्व शिक्षकांचा सहभाग लाभला.