अतिवृष्टी झाल्यामुळे पीक व घरांचे पंचनामे करून भरपाई द्या..संदीप गवई राष्ट्रवादी काँग्रेस( शरदचंद्र पवार गट )

 


बुलढाणा, मेहकर : गत दोन ते चार दिवसामध्ये प्रमाणात अतीवृष्टी झाली आहे. यामुळे नुकतेच दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केली आहे. 

   यंदाच्या खरीप हंगामात मागील काही दिवसात झालेला पुरेसा पाऊस व विविध सिंचन सुविधा अंतर्गत विविध पीक लागवड करण्यात आली आहे. मात्र गत दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात मोठ्या लागवड झालेली खरीप पिके पाण्याखाली बुडाली आहेत. तसेच अनेकांच्या मातीच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. ऐन पावसाळ्यात अनेकांची घर पडल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. 

    हजारो रुपये खर्चून लागवड केलेली खरीप पिके पाण्याखाली बुडाल्याने पिके पूर्णतः नष्ट होण्याची भीती आहे. या परिस्थितीत शासनाच्या आपत्ती निवारण विभागाने तत्काळ दाखल घेवून अतीवृष्टीमुळे बाधित पिके व घरांचे तत्काळ पंचनामे करून पीडितांना नुकसान भरपाई देण्याची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post