परम पूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी शेडगेबाबा यांच्या कृपाशीर्वादाने याही वर्षी ग्रामीण भागात शालेय साहित्य वाटप...!

 




रायगड (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी शेडगेबाबा हे गेले 12 वर्ष सातत्याने ग्रामीण भागामध्ये दरवर्षी शालेय साहित्य वाटप करत होते. त्यांचे ब्रीद वाक्य म्हणजेच जनसेवा हाच खरा परमार्थ यालाच अनुसरून नित्यनेमाने त्यांचे चिरंजीव ह भ प.  उमेश महाराज शेंडगे यांनी त्यांच्या वडिलांचे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन कांगोरीगड पायथ्याशी असलेल्या पिंपळवाडी येथील अनेक शाळेमध्ये 7 जुलै 2024 रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 

     तसेच विभागातील निगडे हायस्कूल, निगडे प्राथमिक शाळा,गोळेकोंड , रुपवली, वांद्रेकोंडा,पिंपळवाडी, गोठवली या गावातील सर्व गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य लाँग नोट बुक, कॅम्पस बॉक्स,शालेय बॅग ,पेन पेन्सिल इत्यादी साहित्य वाटप केले आहे. जन सेवा हाच खरा परमार्थ हे बाबांचे ब्रीदवाक्य आहे. गेले 12 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जात आहे.

अनेक समाज सेवकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केली आहे. विशेष सहकार्य म्हणजे सेवार्थ फाऊंडेशन डॉ.दिलीप पवार , सन्मानीय धीरुभाई व्यास  (चेअरमन standard gresess specialy pvt ltd.) यायचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

     निशांत सानप व प्रविण जाधव, ज्योत्स्ना हरिश जाधव (नगरसेविका नाशिक कलवण) यायचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास ह भ प. फणसे गुरुजी, पिंपळवाडी गावचे सरपंच संदीप सुर्वे, उपसरपंच कल्पेश पांगारे, शाखाप्रमुख चंद्रकांत शेठ गोगावले, माजी सरपंच शिवाजी शेलार, निगडे गावचे सरपंच  नूतन मोरे, समाज सेवक कृष्णा खोत, मुख्याध्यापक मूगदुल सर, निकम सर, गोळेकोंडचे शिक्षक शिंदे आणि सर्व शिक्षक वर्ग व पालक यांनी हजेरी लावली. शेडगे बाबा यांचे चिरंजीव ह भ प. उमेश सिताराम शेडगे,  प्रकाश सिताराम शेडगे, भाऊ सिताराम शेडगे व लीला दळवी यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post