नेरपींगळाई :- मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे श्रीराम उत्सव समिती सेवायुवक च्या युवा तरूणांनी एकत्रीत ऐऊन नेरपिंगळाई येथिल मुख्य बाजारचौकातिल रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करून गुरू पौर्णिमा उत्सव साजरा केला काही महिन्यांपूर्वी श्रीराम उत्सव समिती ने पुढाकार घेऊन शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे वर छत्री घुंगट लावण्यात आले होते.
दरवर्षी श्रीराम उत्सव समिती सेवायुवक नेरपिंगळाई च्या वतिने शिवाजी महाराजांची जयंती, श्रीराम नवमी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते व नेहमी सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. श्रीराम उत्सव समिती सेवायुवक नेरपिंगळाई चे पदाधिकारी सदस्य रमण माहोरे,तेजस देशमुख,शुभम आंबेकर, विक्की अंभोरे,अक्षय मेसरे, प्रसन्न देशमुख,विनित राऊत,अनिकेत, साखरकर, गजानन घोडाम, ऋषिकेश बेहरे व इतर सहकाऱ्यांनि सुरू केलेल्या सामाजिक धार्मिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.