मधुबन वृद्धाश्रम येथे अर्चना इंगळे यांचा वाढदिवस साजरा

 




चांदुर रेल्वे /आजच्या युगात प्रत्येक जण आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो कोणी आपल्या कुटुंबासोबत तर कोणी रेस्टॉरंटचा धाब्यावर जाऊन पार्टी करून साजरा केला जातो.

 पण चांदुर रेल्वे तालुक्यातील निमगाव येथील रहिवाशी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता अर्चना इंगळे यांनी त्यांचा वाढदिवस मधुबन वृद्धाश्रम येथे अगदी साध्या पद्धतीने साजरा केला ,यावेळी त्यांनी वृद्धाश्रम मध्ये राहत असलेल्या वृद्ध महिला व पुरुष सोबत केक कापून त्यांना बिस्किट आणि फळाचे वाटप केले, तर त्यांचे दुःख आणि वेदना जाणून घेतल्या आयुष्यात असे प्रसंग कोणावर येऊ नये अशी त्यांनी खंत व्यक्त केली, यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांनी अर्चना इंगळे यांना भरभरून आशीर्वाद दिले, वृद्धाश्रम येथे त्यांची भेट सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका यांच्यासोबत झाली, सेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना जगण्यापुरती तरी पेन्शन सरकारने द्यावी जेणेकरून त्यांना जगण्याकरिता थोडीफार तरी मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

   अर्चना इंगळे ही सुद्धा एक अंगणवाडी सेविका आहे म्हणून त्यांना अंगणवाडी सेविका बद्दल जास्त आपुलकी आहे. 



 यावेळी त्यांच्यासोबत भागवत बाबा महाराज बेलसरे मधुबन वृद्धाश्रम चे संस्थापक श्री साउ रकर, वैशाली वानखेडे शेषराव लंगडे आदी लोक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post