सिकलसेल रुग्णाच्या कथा आणि व्यथा या विशेषांकाचे प्रकाशन.

 


 

सिकलसेल संघ अमरावतीचा स्तुत्य उपक्रम

 

प्रतिनिधी प्रमोद घाटे

अमरावती: सिकलसेल संघ अमरावती यांच्या वतीने सिकलसेल रुग्णांसाठी काढण्यात आलेल्या "सिकलसेल रुग्णांच्या कथा आणि व्यथा" या विशेष अंकाचे प्रकाशन बुद्ध जयंतीच्या पावन पर्वावर करण्यात आले 

सिकलसेल समुपदेशक प्रा. मनोज पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या अंकात, सिकलसेल रुग्णांच्या अनुभवावर आधारित त्यांचे मनोगत, त्यांच्या कथा आणि त्यांच्या व्यथा, तसेच समाजात वावरताना येणारे अनुभव, सिकलसेल संबंधी माहिती, त्यावरील उपाय, औषधोपचार, वैद्यकीय चाचण्या यासंबंधीची माहिती या विशेषांकात असून सिकलसेल आजाराच्या इतिहासात महाराष्ट्रातील हा पहिलाच विशेषांक ठरला आहे. 

या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. विलास जाधव, वैद्यकीय अधिकारी सिकलसेल विभाग सामान्य रुग्णालय अमरावती, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर सिकलसेल संघाचे अध्यक्ष गोवर्धन भगत, उपाध्यक्ष अशोक भोरे, सहसचिव डॉ. कमलाकर गोवर्धन, संडे मिशनचे अशोक मेश्राम, भारतीय दलित पॅंथर चे प्रशिक पाटील, मनोज धुळेकर पियुष पाटील जीवन रेखा रक्तपेढीचे प्रज्वल बागडे. उपस्थित होते.




यावेळी बोलताना डॉ. विलास जाधव म्हणाले की, सिकलसेल रुग्णांसाठी सामान्य रुग्णालयात वैद्यकीय सेवा तत्पर आहे. सिकलसेल आजार वाढू नये यासाठी लग्न ठरवितांना रुग्ण - रुग्णांचे लग्न ठरवू नये, तसेच गर्भजल परीक्षा व बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन हे उपाय सुद्धा आहेत.

प्रस्तावनेमध्ये अशोक भोरे यांनी सिकलसेल संघ अमरावतीचा आज पर्यंतचा प्रवास उलगडून दाखविला. सिकलसेल समुपदेशक प्रा. मनोज पाटील यांनी हा अंक काढण्याची आवश्यकता का भासली याचे सविस्तर विवेचन केले तर डॉ. कमलाकर गोवर्धन यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. आक्रमण संघटनेचे ॲड. सुनील गजभिये यांनी सिकलसेल रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचे व रुग्णांच्या हक्कासाठी कायदेशीर लढाई कशी लढावी याचे मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमासाठी भारतीय दलीत पँथर संघटना महाराष्ट्र भारतीय दलित पॅंथर , सिकलसेल संघटना अमरावती, संडे मिशन, मूलनिवासी संघ, बामसेफ संघटना, आक्रमण संघटना, भीम ब्रिगेड संघटना, भीम आर्मी संघटना, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, जिल्हा सामान्य रुग्णालय या अमरावती मधील सर्व संघटनांनी कार्यक्रम आयोजित करण्यात महत्त्वाचा हातभार लावला. 

या कार्यक्रमाचे संचालन अश्विनी भगत व पायल लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन एड. संकेत इंगळे यांनी केले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मनोज पाटील, गोवर्धन भगत, अशोक भोरे, विष्णू बोर्डे, दिवाकर मेश्राम, डॉ. कमलाकर गोवर्धन, राजेश डहाट ,रोहित दुपारे, रजत वानखेडे, प्रफुल खडसे, इंद्रपाल लोखंडे, सुनील ढोके, साची रंगारी, मयुरी ढोके, एड. संकेत इंगळे, आवेस खान, साहिल डोंगरे, पायल लोखंडे, रमा खाकसे यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post