तीन तासांचे ठिय्या आंदोलना नंतर अखेर शेतकऱ्यांना मिळाला न्याय
नांदगाव खंडेश्वर : उपधिक्षक भुमि अभिलेख नांदगाव खंडेश्वर येथील कार्यालयात अनागोंदि व मनमानी कारभार सुरु असल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी कार्यालयात तीन तास ठिय्या देऊन कार्यलयाला ताला ठोकोची भूमिका घेतल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आंदोलन कर्त्यांची आक्रमक भूमिका पाहून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेत मोजणीच्या तारखा दिल्या व उर्वरित प्रकरणे १५ दिवसांचे आत निकाली काढणार असल्याचे वरिष्ठांशी चर्चा करून लेखी पत्र देण्यात आले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
भुमि अभिलेख कार्यालयातील कारभार मनमानी चालत असुन अधिकारी व कर्मचारी नेहमी गैरहजर राहतात त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे अधिकारी भेटत नसल्याने शेतकरी प्रचंड त्रासले आहे मोजणी करिता तातडीचे पैसे भरूनही काही शेतकऱ्यांच्या मोजण्या १ वर्षांपासून तर काही मोजण्या ६ महिन्या पासून प्रलंबित होत्या दुसरीकडे मात्र पैसे घेऊन काही विशिष्ट नामकितांच्या मोजण्या दोन महिण्यात निकाली निघाल्याचे लक्षात आल्याने शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी अगोदरच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने अखेर प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी भुमि अभिलेख कार्यालयात धडक देऊन तब्बल तीन तास ठिय्या दिला व कार्यालयाला ताला ठोकोची भूमिका घेतली दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिल्याने आंदोलनकर्त्यांनी कुलूप आणून ताला ठोकण्याचा इशारा दिल्याने काही वेळ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आंदोलन कर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर संबंधित शेतकऱ्यांना ५ जूनला मोजणी करणार असल्याची नोटीस तात्काळ दिली व तक्रारीनुसार चौकशी करून यात दोषींवर कार्यवाही करून इतर प्रकरणे १५ दिवसांत निकाली काढण्याचे लेखी आश्वासना देण्यात आले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर शहर संघटक भूषण दुधे प्रवीण बेहरे जयंत सुने शुभम रावेकर भुमेश्वर गोरे सुरज लोमटे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.
मी गेल्या एक वर्षेपासून कार्यालयात मोजणी करिता चकरा मारत असून एक वर्षांनंतर मला मोजणीची तारीख मिळाली तरी संबंधित दोषी अधिकाऱ्यांनवर कार्यवाही करावी.
अंबादास सातंगे शेतकरी शेलुगुंड
---------------------------------
फेब्रुवारी महिन्यात शेताच्या मोजणी करिता अतितातडीच्या मोजणीचे पैसे भरले दोन महिने मी कार्यालयात चकरा मारल्या मार्च महिण्याचे मोजणीचे प्रकरण निकाली निघाले मात्र मला प्रचंड त्रास दिला आज अखेर शिवसेनेच्या आंदोलनाने मला ५ जून मोजणीची तारीख मिळाली.
चतुर लोणारे शेतकरी गावणेर
--------------------–------------
नांदगाव खंडेश्वर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजात सुधारणा झाली नाही किंवा शेतकऱ्यांना असाच त्रास झाल्यास शिवसेना या नंतर प्रखर आंदोलनाची भूमिका घेईल..
प्रकाश मारोटकर
माजी जिल्हाप्रमुख युवा सेना