डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फडल्या बद्दल भाजपचे देश भर आंदोलन.. जंतर मंतर वर संविधान फाडले; डॉ. बाबासाहेब चे फोटो पायाखाली तुडवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद चे नारे लावले तेव्हा भाजपा ने देशात आंदोलन का केले नाही..? भीम ब्रिगेड संघटना...
भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी आव्हानं केल की जितेंद्र आव्हाड यांनी फोटो फाडला म्हणून जग भर आंदोलन... बावनकुळे, जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडी चे आहे म्हणून की बहुजन आहे. म्हणून किंवा नेहमी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भूमिका मांडतात म्हणून बावनकुळे तुम्हाला फक्त हा इव्हेंट करायचा आहे राजकारण करायचे आहे.
म्हणजे तुम्ही आंबेडकर वादी अनुयायी यांना भावनिक करायच आणि दाखवायचे की आम्ही डॉ. आंबेडकर साठी रस्यावर उतरलो चांगली गोष्ट आहे.
मात्र हेच आंदोलन जर मनुस्मृती सर्व शालेय अभ्यासकर्मात सुरु करण्याचा निर्णय तुमच्या भारतीय जनता पार्टी च्या मंत्र्यांनी घेतला त्याच्या अगोदर निषेध करा व त्या साठी जग भर देश भर महाराष्ट्र भर आंदोलन करा. भिम ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य राजेश वानखडे संस्थापक अध्यक्ष बावनकुळे जी फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा भिम ब्रिगेड संघटना वतीने अचलपूर दिक्षाभूमी करिता 3 कोटी रुपये निधी मागितला होता देतो म्हणाले अजून नाहीं दिला चंद्रकांत पाटील पालकमंत्री आहेत.
त्यांना सुद्धा अचलपूर दिक्षाभूमी करिता निधी मागितला होता म्हणाले की 3 कोटी नका मागू 30 कोटी देतो आता निवेदन देऊन एक दीड वर्ष होत आहे.
3 रुपये सुध्दा दिले नाही.. बावनकुळे जर आंदोलन करायचे असेल तर या विषयाला घेऊन आंदोलन करा...भीम ब्रिगेड संघटना
जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करायला आंबेडकर वादी संघटना सक्षम असल्याची माहिती भीम ब्रिगेड संघटनेकडून देण्यात आली आहे..