नेरपिंगळाई येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

 



मोर्शी प्रतिनिधी प्रमोद घाटे नेरपिंगळाई  : अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नेरपिंगळाई मधिल रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, संवीधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 




   व भव्य प्रचार मिरवणूक काढण्यात आली यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post