वाशीम : मालेगाव तालुक्यातील मौजे डोंगरकिन्ही येथे धम्म क्रांति परिषद अतिशय उत्साहात पार पडली.या धम्म परिषद ला सकाळी आठ वाजता धम्म रॅली पासुन सुरुवात करण्यात आली. नंतर 12 ते 4 भिक्सू संघाकडुन धम्मप्रवचन /धम्मसाधना देण्यात आली.
नंतर सर्व उपस्थितांना भोजन दान देण्यात आले सायंकाळी ठिक 6 वाजता विविध मान्यवरांना पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. कवि गायक प्रज्ञानंद भगत समाज रत्न , भाई कैलाश सुखदाने संघर्ष योद्धा ,किशोरदादा गवई संघर्ष नायक, समाधान गायकवाड़ धम्मरत्न, आरती इंगळे यांना रमाई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यासह विविध विषयावर कैलास भाई सुखदाने, जे एस शिंदे, देवा इंगळे, बबनराव बनसोड यांनी मार्गदर्शन केले तर विनोद अंभोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार प्रदर्शन केले.
तर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पंचशील मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले. नंतर 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जंगि बुद्ध भिम गितांचा बहारदार कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पंचशील मित्र मंडळाने व भिमशक्ती मित्र मंडळ यांच्यासह सर्व समाज बांधवांनी अतिशय परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विषेश योगदान शाहिर संजय ईंगळे यांनी केले..