आदिवासी समाजातील लोकांना एकत्र करून क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या विचाराची जंगोम सेना निर्माण करण्याची आवश्यकता आहे - मधुसूदन कोवे गुरुजी

 



प्रतिनिधी/रूस्तम शेख - विर बाबुराव शेडमाके यांच्या १९१ व्या जयंती च्या निमित्ताने तिरु वर्षाताई आडे तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगाव यांच्या पुढाकाराने "चिखना" जयंती निमित्त सामाजिक प्रबोधन सभा आयोजित केली होती. त्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिताताई ऊईके राष्ट्रिय महासचिव गोंडवाना गणतंत्र पार्टी नागपूर सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी उपस्थित होते. उद्घाटक म्हणून प्रदेश कमेटी कार्याध्यक्ष तिरु बळवंतराव मडावी गोंडवाना गणतंत्र पार्टी हे उपस्थित होते सोबत क्रांतीवीरची हिस्टोरीकल गोंडवाना चे मुख्य मार्गदर्शक मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच उपस्थित होते.

 कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर धनंजय पुरके, अरविंद तामगाडगे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव सोयाम, सुर्यभान मेश्राम चंद्रभागा मेश्राम तिरु विजयाताई रोहणकर जिल्हा अध्यक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ, गजानन कुमरे, तालुका अध्यक्ष केळापूर प्रशिक कांबळे गुरुजी पिंपळसुटी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विर बाबुराव शेडमाके यांच्या विचाराची यशोगाथा सामाजिक सभ्यता , आणि आदिवासी एकता या विषयावर महत्त्व पुर्ण विचार व्यक्त केले.

    राजकीय पुढारी भांभावले की काय,त्यांची बेताल वक्तव्य जेव्हा आदिवासी समाजामध्ये ऐकायला येतं तेव्हा समाजातील सभ्यता सोडली असे दिसून येते ही आदिवासी समाजाची संस्कृती नाही अशा विकृत विचारांच्या विरोधात, आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात विर बाबुराव शेडमाके यांनी जंगोम सेना निर्माण केली होती हे या जयंती च्या निमित्ताने प्रामुख्याने मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी आपल्या मार्गदर्शन केले.

दहा पंधरा घराच्या वस्तीत शेकडो लोक गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या विचारांची मानसं गोंळा होते याचा अर्थ असा आहे की आदिवासी च्या राजकीय पुढाऱ्यावरचा विश्वास उडाला आहे. असे चित्र समाज प्रबोधन सभेत दिसून येत होते.या कार्यक्रमाचे आयोजन करणारे तिरु हर्षल आडे जिल्हा संघटक गोंडवाना गणतंत्र पार्टी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करणारे सुरेश सलाम आणि कार्यक्रमाला सहकार्य करणारे समिर कुमरे, गजानन कुमरे, कैलास कुमरे, लक्ष्मण गेडाम, भाऊराव तोडासे ,अशोक सलाम सुरेश सलाम बनबाई सलाम लक्ष्मी सलाम मनिषा कनाके, कुसुम कुमरे, वनिता गेडाम, प्रतिभा शेडमाके राजु कनाके, आनंद शेडमाके, अजय सलाम ,अक्षय कुमरे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला म्हणून आयोजक सौ वर्षा आडे तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि हर्षल  आडे जिल्हा संघटक गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी गावकऱ्यांचे आणि सर्व मान्यवरांचे मनःपुर्वक आभार व्यक्त केले..

Post a Comment

Previous Post Next Post