लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा
यथार्थ गीतेचे विनामुल्य वितरण....अनेक अतिथी व बहूमानप्राप्त ५ जण सन्मानित
अकोला- सामाजिक आणि पत्रकारिता अशा संकल्पनेतून कृतिशील पत्रकारितेची संघटनशक्ती उभी करणारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही संवेदनशील मनांची एक लोकचळवळ आहे.धारदार लेखणी आणि कृतिशील पत्रकारितेतून पत्रकारांसोबत समाजालाही न्याय देऊन वंचितांच्या हाकेला प्रतिसाद देणे ही या संघटनेची साधना आहे.असे प्रतिपादन आध्यात्मिक,सामाजिक सेवाव्रती व अकोल्यातील कस्तूरी चॅरीटेबल सोसायटीचे संस्थापक- अध्यक्ष प्रा.किशोर बुटोले यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या व्दितीय संघटन अभियानातील ५ वा नियमित मासिक विचारमंथन मेळावा त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्राचार्य प्रकाश डवले व मराठा सेवा संघाचे प्रदेश कोषाध्यक्ष अशोक पटोकार या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तर लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर ) व केन्द्रीय पदाधिकारी पुष्पराज गावंडे यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अतिथींनी सुध्दा संघटनेच्या उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी सर्वप्रथम लोकस्वातंत्र्यचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांना हारार्पण ,वंदन करून अभिवादन करण्यात आले.शहिद दिनी स्वातंत्र्य चळवळीतील, सीमेवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी गेलेल्या शहिदांना आणि अपघातातील बळींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुंबईच्या परमहंस स्वामी अडगडानंदजी आश्रम ट्रस्टच्या योजनेतून यथार्थ गीता ग्रथांचे विनामुल्य वितरण करण्यात आले. अध्यक्ष संजय देशमुख यांनी पत्रकार हल्ला प्रकरणांसह, शासनाचा जाहिरात वितरणातील पक्षपात, पत्रकार कल्याण योजनांबद्दल दाद मागण्याची संघटनेची भूमिका ,राज्यभरात साध्य झालेले संघटनकार्य आणि वाटचाल व उध्देशांची माहिती प्रास्ताविकातून दिली.
याप्रसंगी अतिथींना शाल,यथार्थगीता सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.ज्येष्ठ पदाधिकारी प्रा.राजाभाऊ देशमुख,प्रा.डॉ.संतोष हूशे, भाजप प्रदेश कार्यकारिणीतील नियुक्तीबद्दल किशोर मानकर, तिक्ष्णगत मिडिया आणि दैनिक अजिंक्य भारतामध्ये संचालिका म्हणून नियुक्तीबद्दल पदाधिकारी सौ.जया भारती इंगोले, पुस्तक प्रकाशनाबध्दल डॉ.विनय दांदळे आणि प्रभावी साहित्यकृतींच्या मुल्यमापनातून विविध पुरस्कार बहूमानाबध्दल कवि सुरेश पाचकवडे व डॉ.अशोक सिरसाट यांनाही सन्मानित करण्यात आले.यावेळी केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,,माजी न्यायाधीश अॕड.नितीन अग्रवाल, विधी मार्गदर्शक अॕड.नितीन धूत, प्रा.मोहन काळे,सिध्देश्वर देशमुख,अंबादास तल्हार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम,सौ.दिपाली बाहेकर दिलीप नवले,सतिश देशमुख या पदाधिकाऱ्यांची व पी.डब्ल्यू शेवतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा संघटन व संपर्क प्रमुख सौ.दिपाली बाहेकर यांच्या संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला सन्मानित पदाधिकाऱ्यांसह सुरेश तिडके, राजाभाऊ देशमुख(रामतिरथकर)अनंत मोहल्ले, पि.एल.जामोदे, वसंतराव देशमुख,शामराव देशमुख, (नारखेडकर),संतोष धरमकर,अनंतराव देशमुख,आकाश हरणे,धारेराव देशमुख, पसायदान संपादक प्रा.सुरेश कुलकर्णी,संकेत देशमुख,जगन्नाथ गव्हाळे, रविन्द्र देशमुख,कैलास टकोरे,जयंत देशमुख, सुरेश भारती,गजाननराव देशमुख,गौरव देशमुख, कृष्णा चव्हाण,गजानन चव्हाण,सौ..प्रतिभा व गजानन काटे,शिवचरण डोंगरे, व अनेक पदाधिकारी,सभासद उपस्थित होते.आभारप्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले.