डोंबिवलीतील येथील हम चॅरिटेबल ट्रस्ट, राजेंद्र शिक्षण संस्था, ओमकार एज्युकेशन सोसायटी आणि टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंबिवली यांच्या आर्थिक सहभागातून जम्मू काश्मीर येथे तीन प्रयोग शाळांची उभारणी

 



डोंबिवलीतील येथील हम चॅरिटेबल ट्रस्ट, राजेंद्र शिक्षण संस्था, ओमकार एज्युकेशन सोसायटी आणि टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंबिवली यांच्या आर्थिक सहभागातून जम्मू काश्मीर येथे तीन प्रयोग शाळांची उभारणी





डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

डोंबिवलीतील हम चॅरिटेबल ट्रस्टने मनोज नशिराबादकर यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण सहा महिन्यापूर्वी जम्मू काश्मीर येथील सहा शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा उभ्या करण्याचा संकल्प केला होता. १८ मार्च, २०२४ रोजी या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन तीन विद्यालयांमधील विज्ञान प्रयोगशाळांचे उद्घाटन झाले. उद्घाटन भारतीय विद्या मंदीर, अंबफला या शाळेतील बाळासाहेब देवरस सभागृहामधून श्री. प्रदीपकुमारजी, विद्याभरातीचे अखिल भारतीय CSR आणि अभिलेख प्रमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी श्री. विजय नड्डाजी, विद्या भारतीचे संघटन मंत्री तसेच श्री. वेदभूषण शर्मा, भारतीय शिक्षा समितीचे अध्यक्ष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रयोगशाळेसाठी लागणारे थोडेसे बांधकाम, प्रयोग साहित्याची खरेदी आणि त्याची योग्य मांडणी व शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण या सर्व गोष्टींची जबाबदारी हम चँरिटेबल ट्रस्टमार्फत घेण्यात आली होती. भारतीय शिक्षा समितीच्या अंबफला, दशमेशनगर, हिरानगर, भादरवा, राजौरी, उधमपूर या ठिकाणच्या शाळांमध्ये प्रयोगशाळा बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. साधारण ऑक्टोबर, २०२३ पासून यासाठी निधी संकलन व इतर गोष्टींची तयारी सुरू झाली. नेहमीप्रमाणेच दानशूर डोंबिवलीकर हमच्या पाठीशी उभे राहिले आणि एकेका प्रयोग शाळेसाठी लागणारा सुमारे ५ ते ६ लाख एवढा निधी एकेका दात्यानी पूर्ण केला. यामध्ये प्रामुख्याने राजेंद्र शिक्षण संस्था, ओमकार एज्युकेशन सोसायटी आणि टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या संस्थांचे मोलाचे योगदान लाभले. अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या निधीसंकलनाकरिता सहा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आणि त्यातून दोन शाळांमधील वैज्ञानिक प्रयोगशाळांसाठी निधी संकलन केले. या कार्यक्रमांमुळेच हम ही संस्था व जम्मू काश्मीर येथील वैज्ञानिक प्रयोग शाळांसाठीचे निधी संकलन हा विषय अनेकांपर्यंत पोचण्यास मदत झाली. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत डोंबिवलीतील श्री. माधव जोशी, श्री. चंद्रशेखर टिळक, श्री.संदीप घरत, पोंक्षे कुटुंबिय आणि दोन कंपन्यांच्या CSR funds मधून निधी संकलन पूर्ण करण्यात आले. निधी संकलनाबरोबरच महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रयोगशाळेतील उपकरणे व साहित्य जम्मुपर्यंत पोचवणे, प्रयोगशाळेची मांडणी करणे हे होते. मनोज नशिराबादकर यांच्या बरोबरीने या मध्ये मोलाचे सहकार्य दिले ते डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव श्री. संजय कुलकर्णी यांनी. गेल्या काही महिन्यात दोन वेळा स्वखर्चाने तिथे जाऊन दहा दहा दिवस राहून, या विषयातील आपल्या अनुभवातून प्रयोगशाळा उभ्या केल्या. तेथील शिक्षकांना त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण दिले. तीन प्रयोगशाळा उद्घाटन समारंभाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एक बटण दाबून एकाचवेळी तिन्ही ठिकाणीचा पडदा बाजूला करण्यात आला. तसेच झूमद्वारे हम चे विविध ठिकाणी असलेले कार्यकर्ते , देणगीदार आणि हितचिंतक या कार्यक्रमात सहभागी झाले.

e-inauguration हे तंत्रज्ञान डडवारा येथील भारतीय शिक्षा समितीच्या शाळेत शिकणाऱ्या  आशिष सपोलिया आणि अच्युत महाजन या विद्यार्थ्यांनी त्याठिकाणी राबविले. जम्मू काश्मीर बदलत आहे याचाच हा दाखला आहे आणि म्हणूनच प्रकल्पूर्तीचा आनंद चारही संस्थाना खूपच आहे असे हम संस्थेचे अध्यक्ष सुनिल देशपांडे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post