प्रतिनिधी, प्रमोद घाटे :
स्थानिक काटपूर येथील शेतकरी नानुभाऊ राऊत हे आपल्या शेतात काम करीत असतांना अज्ञात शिका-यांनी डुकराच्या शिकारीसाठी शेतात ठेवलेल्या विस्फोटक पदार्थांच्या स्फोटामुळे त्यांच्या दोन्ही हातांसोबत ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले. सदर घटनेची चाहूल लागताच माजी जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड यांनी धाव घेवून जखमींना अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले.
अशा घटनेला इतर शेतकरी बांधव बळी पडू नये याकरिता संबंधित शेतकऱ्याने शिरखेड पोलीस स्टेशन येथे अज्ञात शिक-यांविरुद्ध तक्रार दाखल केली.यावेळी सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड, प्रा.ज्ञानेश्वर टिंगणे, गौरव मडके, मंगेश कथिलकर, इकाबाल हुसेन उपस्थित होते.
अशा विस्फोटक पदार्थांपासून शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा शीरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिनजी लुले व शरद मोहोड यांनी दिला.
तसेच ठाणेदार यांनी लवकरच अज्ञात शिका-यांचा शोध घेवून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.