अतनूर परिसरातील २८ गाव-तांडा-वस्ती-वाडीत मतदान जागृती

 



अतनूर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे, सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्या निर्देशनुसार व सौ.सुरेखा स्वामी तहसीलदार जळकोट यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सज्जा अतनूर ता. जळकोट येथे स्वीप SVEEP अंतर्गत अतनूर परिसरातील २८ गावातील वाडी-तांडा-वस्तीत विविध कार्यक्रम घेऊन मतदार जनजागृती करण्यात आली. सदर मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन अतनूर सज्जाचे तलाठी अतिक शेख व घोनसी मंडळाचे मंडळअधिकारी राजेंद्र कांबळे यांनी दि. २४ फेब्रुवारीपासून मौजे मरसांगवी येथे कार्यक्रम घेऊन लोकांना मतदानाचे महत्व सांगितले तसेच मतदान करण्यासाठी जागृत केले. तसेच दि.२५ फेब्रुवारी रॊजी गव्हाण, चिंचोली व मेवापूर येथे विविध कार्यक्रम घेऊन लोकांना मतदान करण्यास प्रोत्साहित केले. सदर कार्यकामात गावातील बीएलओ, BLO, सरपंच, पोलीस पाटील, सोसायटी चे चेअरमन ई.नी सहकार्य केले. 

तेव्हापासून आजतागायत व आगामी काळात अतनूर परिसरातील २८ गावातील वाडी-तांडा-वस्तीत स्थानिक लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर-अतनूर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ, उदगीर-अतनूर, जय हिंद क्रीडा मंडळ व व्यायामशाळा अतनूर, महाराष्ट्र ग्राहक संरक्षण परिषद शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य व पोलीस दक्षता समितीच्या वतीने पथनाट्यच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. गावोगाव

“मतदान करायला जायचे आहे आपले कर्तव्य बजवायचे आहे..




मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” (नॅशनल व्होटर डे) साजरा केला जातो. याबाबतीत मागील अनेक उदाहरण देत मतदान करण्याबद्दल जनजागृती व मतदान हक्क व मतदार हक्क संदर्भात घरोघरी दारोदारी जाऊन मतदान करण्याविषयी व मतदानाचा हक्क बजावणे विषयी माहिती दिली जात आहे. याबरोबरच देशातील १८ वर्षाच्या तरुणांना पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी मिळते. यासाठी निवडणूक आयोग मतदान दिनी अशा तरुणांना ओळखपत्र देऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. 

२५ जानेवारीलाच मतदार दिन साजरा करण्याचे कारण म्हणजे याच दिवशी १९५० मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या ६१ व्या स्थापना दिनी म्हणजेच २५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवी पाटील यांच्याहस्ते राष्ट्रीय मतदार दिनाची सुरुवात करण्यात आली. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, याची जाणीव या दिवशी मतदारांना करून दिली जाते. मतदार दिन विविध सार्वजनिक ठिकाणी साजरा केला जातो. मतदारांची ओळख करून त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.लोकशाही देशाच्या नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची आणि आठवण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी मतदार दिनाच्या दिवशी मतदारांना मतदानाची शपथही दिली जाते, जेणेकरून ते नागरिक म्हणून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी जागरूक रहातील.

गावकर्‍यांमध्ये, विशेषतः नवमतदारामध्ये मताधिकार, निवडणूक, लोकशाही याविषयी जाणीव- जागृती निर्माण करण्यासाठी सदर दिनाचे महत्व सांगावे जेणेकरून  त्यातून लोककशाही विषयक  वातावरण निर्मिती व्हावी. जेवण ही शरीराची गरज आहे, विचार ही मेंदूची गरज आहे, भावना ही मनाची गरज आहे, मतदान ही देशाची आणि काळाची गरज आहे. त्यामुळे तरुण पिढीला स्वत:च्या जबाबदारीची जाणिव असणे आणि त्या जाणिवेतुन कार्यक्षम होणे म्हणजे समाजाचे विकासात्मक दृष्टीने पुढे पडणारे पाऊल होय.

प्रसार माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे जी कृत्रिमता वर्तनात आणि संभाषणात येत आहे तीच कृत्रिमता तरुण वर्गाच्या कार्यातून दिसत आहे. तरुण वर्ग हा केवळ संख्येच्या अंगातून नाही तर कार्यातून समाजात सहभागी झाला पाहिजे. व्यक्ती समाजाशिवाय राहू शकत नाही आणि समाज व्यक्तींशिवाय बनु शकत नाही. त्यामुळे समाजाप्रती असलेली कर्तव्य, जबाबदारी, सहकार्य, सहानुभूती, सहिष्णुता, आदर, धर्मनिरपेक्षता, समानता, एकनिष्ठता, एकात्मता, विश्वबंधुत्व, विश्वकल्याण यासंबंधी  तरुण पिढीला उद्बोधन केले पाहिजे. तुमचे मत आणि तुमचे सामाजिक कार्य किती महत्वपूर्ण आहे हे तरुणांच्या मन, मस्तिष्क आणि मनगटात भिनवणे गरजेचे आहे.

देशाला जर प्रगतीच्या शिखरावर घेऊन जायचे असेल तर प्रत्येक तरुणाने सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभागी होणे ही काळाची आणि येणाऱ्या सुशिक्षित पिढीची गरज आहे.

आपली जबाबदारी व अधिकार





मजबूत लोकशाहीचा खरा आधार”  याची जाणीव दिनदलित, पददलित गोरगरीब जनतेला व नव मतदारांना आदिवासीबहुल, लमांण तांडयावर बंजारा समाजासह, बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम कामगार मजूरदार, इमारत बांधकाम कामगार मजूरदार, झोपडीत राहणाऱ्या विधवा, परितक्त्या, अनाथ, १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदार महिला व पुरुषांसह, नवतरुणांना, नवयुवकांना नव मतदारांमध्ये मतदान करणे किती गरजेचे आहे व काळाची गरज आहे. या विषयाचे महत्त्व पटवून देण्याचे काम व कार्य ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, अतनूर तलाठी सज्जाचे तलाठी अतीक शेख, मंडळ अधिकारी राजेंद्र कांबळे व इतर अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतचे सरपंच, सर्व सदस्य, कोतवाल, पोलीस पाटील व नवतरुण युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी, कॉलेजकुमार, कॉलेज प्रतिनिधी, महाविद्यालयीन प्रतिनिधी आपलं कर्तव्य समजून निस्वार्थपणे निष्प्रभ पणे कार्य करीत आहेत व मतदान जनजागरण राबवित आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post